प्रस्तावित एम्स रुग्णालय विदर्भ-मराठवाडयाच्या सिमेवर उभारावे!

By Admin | Published: July 22, 2014 10:20 PM2014-07-22T22:20:04+5:302014-07-22T22:20:04+5:30

जिल्हा सरचिटणीस डॉ. ढोके यांची मागणी

Proposed AIIMS hospital should be built on the edge of Vidarbha-Marathwada! | प्रस्तावित एम्स रुग्णालय विदर्भ-मराठवाडयाच्या सिमेवर उभारावे!

प्रस्तावित एम्स रुग्णालय विदर्भ-मराठवाडयाच्या सिमेवर उभारावे!

googlenewsNext

वाशिम: केंद्रातील मोदी सरकारने २0१४-१५ या वर्षासाठी जाहीर केलेल्या अर्थ संकल्पात देशात नविन एम्स रुग्णालय सुरु करण्याची घोषणा केली असून त्यापैकी एक विदर्भात होणार आहे. नविन एम्स रुग्णालय विदर्भातील वाशिम या ऐतिहासीक शहरात उभारण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ.दीपक ढोके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
डॉ.दीपक ढोके यांनी निवेदनात नमुद केले आहे की, भारतातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या कार्य आणि निर्णय क्षमतेवर विश्‍वास ठेवून त्यांच्या नेतृत्वात देशासाठी अच्छे दिन पाहण्यासाठी पूर्ण बहुमत दिले आहे. याची सुरुवात १0 जुलै रोजी जाहीर झालेल्या सबका साथ, सबका विकास अशा सर्वसमावेशक अर्थ संकल्पातून दिसून येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केलेल्या अर्थ संकल्पातील आनंदाची बाब म्हणजे नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्‍वासनापैकी देशात चार नविन एम्स रुग्णालय सुरु होत असून त्यापैकी एक महाराष्ट्रातील विदर्भात होणार आहे. एम्स रुग्णालय झाल्यास मोठी आरोग्य सुविधा विदर्भवासीयांना मिळणार आहे. सदर रूग्णालय नागपूर ऐवजी वाशिमला सुरू करावे अशी मागणी ढोके यांनी केली आहे.

** विदर्भात पूर्वीपासूनच नागपूर येथे मेडिकल कॉलेज, लता मंगेशकर हॉस्पीटल, सुपर स्पेशालीटी तसेच खासगी मोठ मोठे हॉस्पीटल आहेत. नागपूर पासून २00 कि.मी. अंतरावर रायपूरमध्ये एम्स रूग्णालय असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नविन एम्स रुग्णालय विदर्भात वाशिम या मध्यवर्ती ठिकाणी होणे गरजेचे आहे असेही डॉ. दीपक ढोके यांनी म्हटले आहे.

** वाशिमला दळणवळणासाठी राष्ट्रीय, राज्य महामार्ग तसेच रेल्वे मार्ग असून वाशिम हे ठिकाण विदर्भ व मराठवाडयाच्या सीमेवर आहे. त्यामुळे येथे एम्स रूग्णालय सुरू झाल्यास त्याचा लाभ संपूर्ण विदर्भ, मराठवाडयातील जनतेसोबत २00 कि.मी. अंतरावरील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील रुग्णांना मिळू शकतो.शिवाय जिल्ह्यातील नागरिकांना अद्ययावत आरोग्य सेवा मिळून वाशिम जिल्हयाच्या विकासाला मोठी गती मिळेल.

Web Title: Proposed AIIMS hospital should be built on the edge of Vidarbha-Marathwada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.