सहसंचालकांच्या कार्यालयात प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: October 24, 2016 09:35 PM2016-10-24T21:35:46+5:302016-10-24T21:36:00+5:30

वरिष्ठ पदाची वेतननिश्चती व लाभ मिळावा या मागणीसाठी एका प्राध्यापकाने उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांच्या कार्यालयात कीटकनाशक पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली.

Professor's suicide attempt in Joint Director's office | सहसंचालकांच्या कार्यालयात प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सहसंचालकांच्या कार्यालयात प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 24 - वरिष्ठ पदाची वेतननिश्चती व लाभ मिळावा या मागणीसाठी एका प्राध्यापकाने उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांच्या कार्यालयात कीटकनाशक पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. कार्यालयातील कर्मचाºयांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रा. माधव दगडू पगारे (वय ५८, रा. लोणी, ता. राहता, जि. अहमदनगर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. प्रा. पगारे हे प्रवरानगर ग्रामीण शिक्षणशास्त्र संस्थेच्या आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालयात कार्यरत आहेत. उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पगारे हे १९९२ पासून प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. ते मानसशास्त्र विषय शिकवितात. वरिष्ठ पदाची वेतननिश्चिती मिळावी तसेच त्यानुसार सर्व लाभ मिळावेत, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी दुपारी त्यांनी सहसंचालक कार्यालयात जावून आत्महत्येचा प्रयत्न केला. डॉ. नारखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून पगारे यांना ताब्यात घेण्यात आले. 
डॉ. नारखेडे म्हणाले, राज्य शासनाच्या २७ जुन २०१३ च्या परिपत्रकानुसार पगारे यांना वेतननिश्चती व स्थान निश्चितीचा लाभ देण्यात आला आहे. त्यांची मागणी १९९२ पासून हा लाभ मिळावी अशी होती. मात्र, ते यासाठी पात्र नसल्याने हे नियमबाह्य असल्याचे त्यांना वारंवार सांगण्यात आले. त्याबाबत सुनावणीही घेण्यात आली होती. दोन दिवसांपुर्वी त्यांनी कार्यालयात येत आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी दुपारी ते पोलिस आयुक्त कार्यालयाजवळील कार्यालयात कीटकनाशकाची बाटली घेवून आले. बाटलीचे झाकण उघडून तोंडाला लावत असतानाच माझ्यासह इतर कर्मचाºयांनी बाटली हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हाताला जखमही झाली आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांसमोरही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली.
 

Web Title: Professor's suicide attempt in Joint Director's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.