बांधकाम करताना रोपं लावा; झाड आल्यावरच बांधकामाचा वापर परवाना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 08:26 PM2019-06-19T20:26:03+5:302019-06-19T20:28:57+5:30

सोलापूर महापालिकेचा दंडक; रेन वॉटर हॉर्वेस्टिंगसोबत वृक्ष लागवडीचे बंधन

Planting plants during construction; Permission to use the construction of the tree! | बांधकाम करताना रोपं लावा; झाड आल्यावरच बांधकामाचा वापर परवाना !

बांधकाम करताना रोपं लावा; झाड आल्यावरच बांधकामाचा वापर परवाना !

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य शासनाने शहरी भागात वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेतला महापालिकेने शहरात ४० हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केलेशहरातील नव्या बांधकामांसाठी वृक्ष लागवड बंधनकारक करण्यात आली

सोलापूर : महापालिका क्षेत्रात बांधकाम करताना क्षेत्रफळनिहाय वृक्ष लागवड आणि संगोपन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय बांधकामाला मुदतवाढ किंवा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वापर परवाना मिळणार नाही, असे परिपत्रक मनपाच्या बांधकाम विभागाने जारी केले आहे. 

राज्य शासनाने शहरी भागात वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेतला आहे. महापालिकेने शहरात ४० हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. या मोहिमेत शहरातील सर्व शासकीय कार्यालये, सामाजिक, शैक्षणिक संस्था, संघटनांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. यासोबत शहरातील नव्या बांधकामांसाठी वृक्ष लागवड बंधनकारक करण्यात आली आहे. बांधकाम परवानगी विभागाने ११ जून रोजी परिपत्रक काढले आहे. यात क्षेत्रफळ निहाय वृक्ष लागवडीची संख्या जाहीर करण्यात आली आहे. बांधकाम परवानगी देताना संबंधित जागेवर किमान पाच फूट उंचीची झाडे लागवड केली आहे नाही याची तपासणी करण्यात येईल. एक वर्षानंतर बांधकामाला मुदतवाढ देण्यात येते. या मुदतवाढीवेळी परवानाधारक वृक्षांचे संगोपन करतात की नाही याची खातरजमा करण्यात येईल. शिवाय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वापर परवाना मिळविण्यासाठी वृक्षांचे फोटो जोडण्यात यावेत. महापालिकेच्या अधिकाºयांनी पाहणी अहवाल सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. चालू बांधकामांवर ही अट घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकाºयांनी पाठविले होते पत्र
- शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, विकासकांनी बांधकाम  परवानगीतील नियमानुसार वृक्ष लागवड केली आहे की नाही हे तपासण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. भोगवटदारास वृक्ष लागवडीस प्रवृत्त करावे, असेही सांगितले. यापार्श्वभूमीवर मनपाने ही कार्यवाही केली आहे. 

छोटी झाडे लावली, अधिकाºयांनी परत पाठविले
- मागील वर्षी बांधकाम परवानगी घेणाºयांची अनेक बांधकामे पूर्ण झाली आहेत. या बांधकामांना वृक्ष लागवड बंधनकारक करण्यात आली आहे. शहरातील एक नागरिक सोमवारी सायंकाळी आपल्या इमारतीच्या परिसरात लावलेल्या छोट्या फुलांच्या झाडांचे फोटो दाखवत वापर परवाना मागण्यासाठी आले होते. परंतु, उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी किमान तीन ते पाच फूट उंचीची झाडे लावा. त्याशिवाय परवाना मिळणार नाही. त्यातून तुमचाच फायदा होणार आहे, असे सांगून परत पाठविले. शहरातील काही लोक इमारती परिसरासोबतच समोरच्या रस्त्यावरही झाडे लावीत आहेत. त्याचे फोटो आणून दाखवीत आहेत, असेही पेंटर यांनी सांगितले. 

प्लॉटचे क्षेत्रफळ        वृक्ष लागवड

  • १ ते १२५ चौ.मी. पर्यंत -         २
  • १२६ ते २५० चौ.मी. पर्यंत    ५
  • २५१ ते ५०० चौ.मी. पर्यंत        १०
  • ५०० ते १००० चौ.मी. पर्यंत    २०
  • १००० चौ.मी.च्या पुढे        उपरोक्त क्षेत्रफळाच्या पटीत

गावठाण बाहेरील भागात वापर परवाना मिळविण्याठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग बंधनकारक आहे. त्यानंतर आता वृक्ष लागवडीची अट घालण्यात आली आहे. भविष्यकाळाची गरज ओळखून वृक्ष लागवडीची सक्ती करण्यात आली आहे. दोन-चार तुळशीची रोपे लावून काम भागणार नाही. चांगली झाडे लावली पाहिजेत. ती जगविली पाहिजे.
- रामचंद्र पेंटर, उपअभियंता, मनपा बांधकाम विभाग. 

Web Title: Planting plants during construction; Permission to use the construction of the tree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.