पंढरपूर वारी २०१९ : टप्पा टेकडी येथे टाळ, मृदुंग गजर व माऊली जयघोषात धावला विठुरायाचा वारकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 08:36 PM2019-07-09T20:36:33+5:302019-07-09T20:37:25+5:30

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टप्पा येथील टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले.

pandharpur wari 2019 : Warkari Runs way of tappa Tekadi | पंढरपूर वारी २०१९ : टप्पा टेकडी येथे टाळ, मृदुंग गजर व माऊली जयघोषात धावला विठुरायाचा वारकरी

पंढरपूर वारी २०१९ : टप्पा टेकडी येथे टाळ, मृदुंग गजर व माऊली जयघोषात धावला विठुरायाचा वारकरी

Next

पंढरपूर : तुका म्हणे धावा.. आहे पंढरी विसावा...असे म्हणत वारकरी टाळ, मृदुंगाचा गजरात व माऊली माऊली  नामाच्या जयघोषात लहान्यापासून ते अबालवृद्ध वैष्णव धावत सुटले होते .पंढरपूर समीप आल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह जाणवत होता. आनंद व जल्लोषाच्या वातावरणात वारकऱ्यांनी धावा पूर्ण केल्या. वारकरी पांडुरंगाला भेटण्यासाठी उतावीळ होऊन ते झपाट्याने पावले टाकीत होते. पांडुरंगाची भेट होणार म्हणून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. यावेळी वारीच्या वाटेवरील नद्यांच्या ओढ्यात वारकऱ्यांनी आंघोळीचा आनंद घेतला. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टप्पा येथील टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे ते येथूनच पंढरपूरपर्यंत धावत सुटले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे वारकरी तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून येथून धावतात. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येथील टेकडीवर गर्दी केली होती.त्यानंतर पालखी  पेराचीकुरोली च्या दिशेने मार्गस्थ झाली आजचा मुक्काम पेरचिकूरोली येथे असणार आहे .बुधवारी सकाळी वाखरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
 
तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यात दाखल झाला आहे . पंढरपूर पोहचण्यासाठी आता फक्त 2 दिवस राहिले आहे.त्यामुळे वारकऱ्याला भेटायची ओढ लागली आहे.
 


    

                      पालखी सोहळ्यात  शिस्त महत्त्वाचीङ्घ   
पालखी सोहळा हा शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे.चोपदार हा अतिशय महत्त्वाची भूमिका पालखी सोहळय़ात बजावतो. त्याच्याच इशाऱयाने पालखी सुरू होते, विसावते. पालखी सोहळय़ात कुणाची मौल्यवान वस्तू हरवली तर ती चोपदाराकरवी परत मिळते. पहाटे ४ ते ४.३० च्या सुमारास दिंडय़ामधील वारकरी प्रातःकालीन स्नानादी विधी उरकतात. सकाळी ६.६.३० ला पालखी निघते. ह्यपुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामह्ण असा गजर पालखी उचलताना होतो. मग जय जय रामकृष्ण हरि सुरू होते. रूप पाहता लोचनी। सुख झाले हो साजणी हा रूपाचा अभंग होतो नंतर मंगलचरणाचे अभंग होतात. त्यानंतर भूपाळय़ा, वासुदेव, आंधळे, पांगळे, संकीर्ण अभंग, विशिष्ट वारांचे अभंग, हरिपाठाचे अभंग होतात. हरिपाठ संपतो त्यावेळी मुक्कामाचे ठिकाण येते. मग विसावा पुन्हा रात्री कीर्तन, हरिजागर!

Web Title: pandharpur wari 2019 : Warkari Runs way of tappa Tekadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.