बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, २७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Published: August 24, 2016 03:51 PM2016-08-24T15:51:21+5:302016-08-24T15:51:21+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलैमध्ये घेण्यात आलेल्या बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

Outcome of XIIth result, 27 percent students passed | बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, २७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, २७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Next

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २४ -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलैमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. राज्याच्या एकुण निकालाची टक्केवारी २७.०३ असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ५.४४ टक्के वाढ झाली आहे.

राज्य मंडळाने पुणे, नागपुर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत यावर्षी पहिल्यांदाच जुलै महिन्यात फेरपरीक्षा घेतली. यापुर्वी आॅक्टोबरमध्ये ही परीक्षा होत होती. यावर्षी ९ जुलै ते २९ जुलै या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. मंडळामार्फत बुधवारी दुपारी एक वाजता संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. राज्यभरातून परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १ लाख २३ हजार १७४ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २१ हजार ७९९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या एकुण निकालाची टक्केवारी २७.०३ असून औरंगाबाद विभागातून सर्वाधिक ३९.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अमरावती विभागातील विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात कमी १८.४८ इतकी आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात सुधारणा झाली आहे. आॅक्टोबर २०१४ मध्ये निकालाची टक्केवारी २६.७७ तर आॅक्टोबर २०१५ मध्ये ही टक्केवारी २१.५९ इतकी होती. 
मंडळाच्या संकेतस्थळावर सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना यामाहिती प्रत घेता येईल. मुळ गुणपत्रिकांचे वाटप संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामार्फत करण्यात येणार असून याबाबतची माहिती नंतर देण्यात येईल. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. ३ सप्टेंबरपर्यंत तर छायांकित प्रतीसाठी दि. १४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असल्याचे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
 
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची विभागनिहाय टक्केवारी
विभागीय मंडळपरीक्षेस बसलेले विद्यार्थीउत्तीर्ण टक्केवारी
पुणे२४०४२६७७०२८.१६
नागपूर१२२०४४२१३३४.५२
औरंगाबाद८५५९३३६३३९.२९
मुंबई३२२०९७०६३२१.९३
कोल्हापूर११६४४३२७४२८.१२
अमरावती१०१३८१८७३१८.४८
नाशिक१५६१४४२४४२७.१८
लातूर६०५८१८३७३०.३२
कोकण१३३१२८४२१.३४
एकुण१,२१,७९९३२,९२१
२७.०३
 
 

Web Title: Outcome of XIIth result, 27 percent students passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.