आमची ताई परत येणार नाही, आठवणीने जीव व्याकूळ, न्यायालयाच्या आवारात आईसह महिलांचा हंबरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:35 AM2017-11-30T04:35:45+5:302017-11-30T04:36:02+5:30

‘आमच्या ताईवर अत्याचार करून तिला संपविणाºया नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली़ निकाल अपेक्षेप्रमाणे लागला़ आम्हाला सोडून गेलेली आमची ताई मात्र परत येणार नाही़ तिच्या आठवणीने आजही जीव व्याकूळ होतो’, अशा भावना...

Our tie will not come back, my life will be confused, my mother's voice in the court premises, | आमची ताई परत येणार नाही, आठवणीने जीव व्याकूळ, न्यायालयाच्या आवारात आईसह महिलांचा हंबरडा

आमची ताई परत येणार नाही, आठवणीने जीव व्याकूळ, न्यायालयाच्या आवारात आईसह महिलांचा हंबरडा

Next

- अरुण वाघमोडे
अहमदनगर : ‘आमच्या ताईवर अत्याचार करून तिला संपविणाºया नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली़ निकाल अपेक्षेप्रमाणे लागला़ आम्हाला सोडून गेलेली आमची ताई मात्र परत येणार नाही़ तिच्या आठवणीने आजही जीव व्याकूळ होतो’, अशा भावना निर्भयाचे वडील, भाऊ, तिच्या मैत्रिणी आणि कोपर्डीतील महिलांनी व्यक्त केली़
कोपर्डीचा निकाल जाहीर होताच निर्भयाची आई व तिच्या मैत्रिणींनी हंबरडा फोडला. ‘माझ्या छकुलीला न्याय मिळाला. मात्र, तिचा आवाज आज कानावर येत नाही’, असे म्हणत पीडितेच्या आईला रडू कोसळले. त्यामुळे सर्वांचेच डोळे पानावले.
निर्भयाची मैत्रीण आणि खटल्यातील महत्त्वाची साक्षीदार असलेली सायली (नाव बदललेले आहे) म्हणाली, शहरापासून दूर असलेल्या कोपर्डी या गावात आजही सुविधा नाहीत़ गावात सातवीपर्यंतच शाळा आहे़ पुढील शिक्षणासाठी कुळधरणला जावे लागते़ शाळेचा रस्ताही खराब झालेला आहे़ गावात पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी गावात पोलीस ठाणे उभारावे़
निर्भयाचा भाऊही न्यायालयात होता. आरोपींना मिळालेल्या फाशीच्या शिक्षेची तत्काळ अंमलबजावणी व्हावी त्यानंतरच आमच्या कुटुंबाला खरे समाधान मिळणार आहे़ घटनेनंतर कोपर्डी ग्रामस्थांसह मराठा समाज पाठीशी उभा राहिला. त्यामुळे मोठा धीर मिळाला़ मात्र, अशी घटना कुणासोबतच पुन्हा घडू नये, अशी भावना त्याने व वडिलांनी व्यक्त केली.
आमचा न्यायदेवतेवर विश्वास होता़ घटना घडल्यानंतर पोलीस अधिकाºयांनी योग्य तपास केला़ अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी हा खटला प्रभावीपणे लढविल्याने न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया कोपर्डीचे पोलीस पाटील समीर जगताप यांनी दिली. कोपर्डीच्या ग्रामस्थांसह मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात गर्दी केली होती.
निकालानंतर न्यायालयाच्या परिसरातही ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा घुमल्या.

Web Title: Our tie will not come back, my life will be confused, my mother's voice in the court premises,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.