मालवाहू वाहनाची चावी काढल्याने शेतकºयांचे चक्काजाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:50 PM2017-10-06T15:50:02+5:302017-10-06T15:52:02+5:30

नाशिक : दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची वाहतूक करणाºया मालवाहू पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक शेतमाल तसेच वाहनाच्या टपावर बसलेल्या शेतकºयांमुळे वाहतूक शाखेच्या दोघा पोलीस कर्मचाºयांनी पिकअप अडवून चावी काढून घेतली़ यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी दिंडोरीनाका येथील हॉटेल गोंधळसमोर रस्त्यात वाहने उभी करीत चक्काजाम आंदोलन केले.

nashik,farmer,traffic,police,problem | मालवाहू वाहनाची चावी काढल्याने शेतकºयांचे चक्काजाम !

मालवाहू वाहनाची चावी काढल्याने शेतकºयांचे चक्काजाम !

Next
ठळक मुद्देवाहतूक पोलिसांकडून पैशांच्या मागणीचा आरोप दिंडोरीनाका : काहीकाळ वाहतूक कोंडी

नाशिक : दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची वाहतूक करणाºया मालवाहू पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक शेतमाल तसेच वाहनाच्या टपावर बसलेल्या शेतकºयांमुळे वाहतूक शाखेच्या दोघा पोलीस कर्मचाºयांनी पिकअप अडवून चावी काढून घेतली़ यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी दिंडोरीनाका येथील हॉटेल गोंधळसमोर रस्त्यात वाहने उभी करीत चक्काजाम आंदोलन केले.

शुक्रवारी दुपारी (दि.६) सव्वा वाजता इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथील पन्नास ते साठ शेतकरी नेहेमीप्रमाणे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणत असताना आडगाव नाक्यावरून वाहतूक पोलिसांनी पिकअपचा पाठलाग केला व क्षमतेपेक्षा जास्त शेतमाल वाहनात भरलेला असून, टपावर शेतकरी बसलेले असल्याने कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली पैसे दिले नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी बाजार समिती प्रवेशद्वारावर अडवून एकनाथ झनकर या शेतकºयांच्या पिकअप (क्रमांक एम. एच. १५ बीजे ७०२८) चावी काढून घेतली त्यानंतर संतप्त झालेल्या पन्नास ते साठ शेतकºयांनी पालेभाज्या वाहने रस्त्यात उभी करून काहीकाळ चक्काजाम आंदोलन केले. चक्काजाममुळे दिंडोरीनाका ते पेठफाटा दरम्यान काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
शेतकºयांनी चक्काजाम केल्याची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, शिवाजी आव्हाड, नवले आदिंनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शेतकºयांची समजूत काढली व चावी काढून पैशाची मागणी करणाºयांची चौकशी करणार असल्याचे सांगितल्याने शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले.

Web Title: nashik,farmer,traffic,police,problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.