नाशिक शस्त्रसाठा प्रकरण : कफसीरपच्या नशेमुळे पाशा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:13 AM2017-12-23T04:13:16+5:302017-12-23T04:13:49+5:30

कफसीरप आणि झोपेच्या गोळ्या घेण्याच्या व्यसनामुळेच, नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. शस्त्रसाठ्याच्या चोरीनंतर पाशाचा सूरतमधील डायमंड शॉप लुटण्याचाही कट होता. मात्र, नाशिक पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावला.

Nashik Weapon Case: Due to the drunkenness of the cops, it was also aimed at robbing the diamond shop of Pasha Police, Surat's Diamond Shop | नाशिक शस्त्रसाठा प्रकरण : कफसीरपच्या नशेमुळे पाशा पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक शस्त्रसाठा प्रकरण : कफसीरपच्या नशेमुळे पाशा पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

मुंबई : कफसीरप आणि झोपेच्या गोळ्या घेण्याच्या व्यसनामुळेच, नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. शस्त्रसाठ्याच्या चोरीनंतर पाशाचा सूरतमधील डायमंड शॉप लुटण्याचाही कट होता. मात्र, नाशिक पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावला.
उत्तर प्रदेशातील गोदामातून शस्त्रसाठा चोरी करून मुंबईकडे परतत असताना, मास्टरमाइंड बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका उर्फ पाशा (२७) याने कफसीरपच्या ५० बॉटल्समधील सीरप घेतले होते. याच नशेत त्याने पेट्रोलपंपावर पैसे मागणाºया कर्मचाºयाच्या डोक्यावर बंदूक रोखली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून आणखी १०० कफसीरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून समजते.
शिवडीच्या क्रॉस रोड परिसरात राहणारा पाशा आणि त्याच्या कुटुंबीयांची त्या परिसरात दहशत आहे. वयाच्या २७व्या वर्षीच त्याच्यावर हत्या, दरोडा, मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, अशा स्वरूपाचे ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्रांसह फेसबुक, सोशल मीडियावर व्हायरल फोटो अपलोड करण्याचे प्रतापही त्याने केले आहेत. कफसीरप आणि झोपेच्या गोळ्यांच्या व्यसनामुळे तो काय करतो, याचे त्याला भानही नसावे.
शस्त्रसाठा चोरी दरम्यानही पाशाने ५० बॉटल्समधील कफसीरप घेतले होते. नाशिक पोलिसांनी त्याला शस्त्रांसह अटक केल्यानंतर, त्याच्याकडून आणखी १०० कफसीरपच्या बॉटल्स जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. पेट्रोल पंपावर त्याच्याकडे पैशांची मागणी करताच, बादशहाकडून पैसे घेण्याची हिंमत कोणी केली, असा जाब विचारत, त्याने तेथील कर्मचाºयाच्या डोक्यावर बंदूक रोखली आणि ही बाब पोलिसांना समजताच नाशिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आॅगस्ट महिन्यातच जयपूर कारागृहातून तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर, त्याने हा शस्त्रचोरीचा कट रचला. उत्तर प्रदेशातील शस्त्रचोरीनंतर त्याने सूरतमधील डायमंड शॉप लुटण्याचा कट आखला होता, अशी माहिती तपासात समोर येत आहे. मात्र, नाशिक पोलिसांमुळे हा डाव फसला.
मुलाचाही सहभाग -
पाशाचे वडील अकबर पाशा उर्फ बादशाह याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याला १९९५ मध्ये पहिली अटक झाली. त्यांना शस्त्रसाठ्याच्याच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. २०१२ मध्येही मुलासोबत शस्त्रांची तस्करी केल्या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. दोघांचेही पाकिस्तानशी जवळचे नाते आहे. पाशाही पाकिस्तानात दोन ते तीन वेळा गेला होता. त्यामुळे एटीएसकडून यामागे दहशतवादाचे काही कनेक्शन आहे का, या दिशेनेही अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Nashik Weapon Case: Due to the drunkenness of the cops, it was also aimed at robbing the diamond shop of Pasha Police, Surat's Diamond Shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक