माझी कृषी योजना : वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:40 PM2018-12-10T13:40:43+5:302018-12-10T13:41:08+5:30

दरवर्षी  तीन जणांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

My Agriculture Scheme : Vasantrao Naik Shetimitra Award | माझी कृषी योजना : वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

माझी कृषी योजना : वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

googlenewsNext

राज्यात असे अनेक जाणकार शेतकरी आहेत ज्यांनी शेती क्षेत्रात मोठे ज्ञान मिळविलेले असून, कोणती पिके केव्हा घ्यावीत, खताची मात्रा किती असावी, कोणते औषध फवारणी करावे. बाजारपेठेत माल कसा न्यावा, याबाबत सखोल ज्ञान असते. अशा शेतकऱ्यांनी आपले ज्ञान आपल्या परिसरातील, गावातील शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार योजना आणलेली आहे. या योजनेची सुरुवात ९४-९५ या साली करण्यात आली. दरवर्षी  तीन जणांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

आपले शेती ज्ञान इतर शेतकऱ्यांना देणारे शेतकरी किंवा स्वत: शेती न करता, पत्रकारिता, संस्था किंवा इतर मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात, अशा लोकांना किंवा शेती क्षेत्राशी संबंधित कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळ शेती आदी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारासाठी निवडले जाते. प्रत्येकी ३० हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन कार्यक्रमात सपत्नीक सत्कार करण्यात येतो. 

Web Title: My Agriculture Scheme : Vasantrao Naik Shetimitra Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.