माझी योजना : संकरित गायी, म्हशींचे गटवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:54 AM2018-10-22T11:54:34+5:302018-10-22T11:55:03+5:30

राज्याच्या दूध उत्पादनामध्ये वाढ करण्याबरोबरच ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना अर्थार्जनाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध

My Agriculture Scheme : hybrid cows, buffaloes supply for groups | माझी योजना : संकरित गायी, म्हशींचे गटवाटप

माझी योजना : संकरित गायी, म्हशींचे गटवाटप

Next

राज्याच्या दूध उत्पादनामध्ये वाढ करण्याबरोबरच ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना अर्थार्जनाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी लाभार्थींना एकूण सहा संकरित गायी/ सहा दुधाळ म्हशींचे गटवाटप करण्याची योजना शासनाची आहे.

याअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीला गटकिमतीच्या ५० टक्के, अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ७५ टक्के अनुदान दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गातील व अनु. जाती/जमातींच्या लाभार्थींना अनुक्रम १० व ५ टक्केएवढा निधी स्वत: उभारणे व उर्वरित रक्कम अनुक्रमे ४० टक्केव २० टक्केबँकेकडून कर्जरूपाने उपलब्ध करून घ्यावयाची आहे.

या योजनेंतर्गत सहा संकरित गायी/म्हशींच्या एका गटाची किंमत ३, ३५, १८४ रुपये निश्चित आहे. यामध्ये गाय/म्हशीची किंमत, जनावरांचा गोठा, स्वयंचलित चाराकटाईयंत्र, खाद्य साठविण्यासाठी शेड, तीन वर्षांचा विमा आदींचा समावेश आहे. यातील सर्वसाधारण लाभार्थीला १ लाख ६७ हजार ५९२ रुपये, तर अनु. जाती/जमातीच्या लाभार्थीला २ लाख ५१ हजार ३८८ रुपये शासकीय अनुदान अनुज्ञेय आहे.

Web Title: My Agriculture Scheme : hybrid cows, buffaloes supply for groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.