मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:05 PM2017-07-22T13:05:29+5:302017-07-22T13:05:29+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे. मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार कायम आहे.

Mumbai, Thane rainy season | मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार

मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 22 -  मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे. मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार कायम आहे. अधन-मधन पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावासमुळे रस्ते वाहतूकीचा वेग मंदावला असला तरी, रस्ते किंवा रेल्वे वाहतूक कोलमडलेली नाही. मुंबई शहर किंवा उपनगरात कुठेही पाणी तुंबलेले नाही. 
आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास समुद्राला भरती येणार असल्याने समुद्रकिनारी किना-यावर धडकणा-या लाटांचा आनंद घेण्यासाठी जाणा-या नागरीकांना पालिका प्रशासनाकडून सर्तकतेचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी समुद्रात 4.62 मीटर उंचीच्या लाटा उसळणार होत्या. 
 
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, तिथे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. 
 
अहमदनगर - भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडीला अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ३०६मिमी पाऊस कोसळला,  भंडारदरा धरण 80 टक्के तर निळवंडे धरण 50 टक्के भरले. पांजरे,घाटघर,भंडारदरा,वाकी तेथेही मुसळधार पाऊस झाला.
 
नाशिक- जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळ पासून  दारणा 13980, गंगापूर 1664 भावली 1663 क्युसेक विसर्ग सुरु आहे. 
 
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला आला पूर
पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून सकाळी 11 वाजल्यापासून  9,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला पूर आला आहे. नदीपात्रातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. 
काल रात्रीपासून 2000 क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती मात्र रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी कायम राहिल्याने टप्याटप्याने पाणी सोडण्याचा वेग वाढविण्यात आला. सध्या 9,500हजार क्यूसेक्सने पाणी नदीत येत आहे. 
धरणाचे 11 दरवाजे 1 फुटाने उचलले आहेत. दुपारी 2 वाजता 14,000 कुसेक्सने पाणी सोडले जाणार असल्याने नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदी लगतच्या सोसायट्यांमध्येही पाणी शिरण्याची भीती आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या रहिवाशांना इशारा दिला आहे. नदीपात्रातील रस्ताही पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी येथे गाड्या लावू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Mumbai, Thane rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.