24 तासांत मुंबई, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

By admin | Published: July 17, 2017 07:58 AM2017-07-17T07:58:55+5:302017-07-17T08:06:41+5:30

मुंबई शहर व उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

Much of the rainy season in Mumbai, Konkan in 24 hours | 24 तासांत मुंबई, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

24 तासांत मुंबई, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - मुंबई शहर व उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वरळी, विले पार्ले, अंधेरी, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाच्या सरी आहेत. दरम्यान, 24 तासांत मुंबई व कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. आतापर्यंत रस्ते व रेल्वे वाहतूक सेवा सुरुळीत सुरू आहेत, वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. 
 
तर गुरुवार (13 जुलै), शुक्रवार (14 जुलै) आणि शनिवार (15 जुलै) असे तब्बल तीन दिवस मनमुराद बरसलेल्या मान्सूनने, रविवारी (16 जुलै ) मात्र विश्रांती घेतली. किंचित कुठे तरी बरसलेल्या पावसाच्या एक-दोन सरी वगळता, रविवारी दिवसभर मान्सूनचा शुकशुकाट होता. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पडझडीच्या घटना घडल्या असून, सुदैवाने यात हानी झालेली नाही.
 
मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सकाळी 8.30 वाजण्याच्या नोंदीनुसार, शहरात २४.३५, पूर्व उपनगरात ६९.२१ आणि पश्चिम उपनगरात ४७.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात एक, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी बांधकामांचा भाग पडला. शहरात सहा, पश्चिम उपनगरात एक अशा एकूण सात ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १६, पूर्व उपनगरात १८ आणि पश्चिम उपनगरात २४ अशा एकूण ५८ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही. 
 

आणखी बातम्या वाचा
(स्वाइन फ्लूने भिवंडीत महिलेचा मृत्यू)
(उल्हासनगरजवळ दरड कोसळून २ ठार, ५ जखमी)
(तारापूर अणुभट्टी-४ दोन महिन्यांपासून बंद)
 
दरम्यान, गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी येथील टेकडीवरील माती आणि झाडे उन्मळून, लगतच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीवर पडली. यात कुणालाही मार लागला नाही. रविवारी असलेल्या काहीशा आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राइव्ह येथे नेहमीप्रमाणे तरुणाईने गर्दी केल्याचे चित्र होते. रविवारी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी सोमवारसह मंगळवारी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
 

Web Title: Much of the rainy season in Mumbai, Konkan in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.