धनगर समाजाचे आंदोलन तीव्र

By admin | Published: July 29, 2014 02:38 AM2014-07-29T02:38:52+5:302014-07-29T02:38:52+5:30

अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे़

The movement of Dhangar community is intense | धनगर समाजाचे आंदोलन तीव्र

धनगर समाजाचे आंदोलन तीव्र

Next

पंढरपूर : अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे़ रविवारी बारामतीत या समाजाच्या युवकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या गाडीची काच फुटली तर, रात्री उशिरा आंदोलकांनी पंढरपूर येथे एक एसटी बस पेटवून दिली तर दुसऱ्या एसटीवर दगडफेक करण्यात आली.
धनगर समाजाच्या आंदोलनाला सुरुवात पंढरीतूनच झाली. राज्य धनगर समाज (एसटी) आरक्षण कृती समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन १५ जुलै रोजी पंढरपूर ते बारामती पदयात्रा निघाली होती़ समितीची राज्य सरकारसोबत शनिवारी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचे पडसाद रविवारी उमटले़ सोनके येथे रविवारी रात्री साडेअकरा वाजता सोलापूर डेपोची कराड-पंढरपूर बस कार्यकर्त्यांनी पेटवली. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. त्यांना प्रथम खाली उतरवले. याप्रकरणी चौघांना अटक केली, तर दुसऱ्या घटनेत पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज चौकात पेट्रोल पंपावर लातूर-पंढरपूर बसवर आंदोलकांनी दगडफेक केल्याचे वाहतूक नियंत्रकांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The movement of Dhangar community is intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.