अल्पसंख्यांकांमध्ये घबराट !

By admin | Published: July 4, 2015 03:00 AM2015-07-04T03:00:46+5:302015-07-04T03:00:46+5:30

मदरशातील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरविण्याचा राज्य सरकारचा निर्णयाला काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे सांगत सरकारचा हा निर्णय अल्पसंख्यांक समाजात

Minority panic! | अल्पसंख्यांकांमध्ये घबराट !

अल्पसंख्यांकांमध्ये घबराट !

Next

मुंबई : मदरशातील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरविण्याचा राज्य सरकारचा निर्णयाला काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे सांगत सरकारचा हा निर्णय अल्पसंख्यांक समाजात घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने मदरशातील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरविण्याचा घेतलेला निर्णय हा केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या धोरणाला छेद देणारा आहे. मुस्लिम समाजातील केवळ ४ टक्के मुले मदरशात शिक्षण घेत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे, असे चव्हाण म्हणाले.
भाजपा मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या आरोपावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मदरशांबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याची खळबळ माजविण्याची ही भाजपाची जुनी नीती असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात १०५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. येत्या ९ व १० जुलै रोजी संपूर्ण राज्यात मोर्चे, निदशर्ने, धरणे आदींच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतरही सरकारने कजर्माफी न दिल्यास विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटताना दिसतील, असा इशारा चव्हाण यांनी दिला.
कजर्मुक्ती आंदोलनाची जिल्हानिहाय जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे व सातारा जिल्ह्यातील आंदोलनांचे नेतृत्व करणार असून, नारायण राणे सिंधुदूर्ग व रत्नागिरीतील आंदोलनांची धुरा सांभाळतील. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात आंदोलनाचे नेतृत्व करतील. या व्यतिरिक्त आ. पतंगराव कदम (सांगली व कोल्हापूर), आ.बाळासाहेब थोरात (नाशिक), आ. माणिकराव ठाकरे (वाशिम व अकोला), रोहिदास पाटील (धुळे व जळगाव), खा. राजीव सातव (हिंगोली), आ. विजय वडेट्टीवार (चंद्रपूर), हर्षवर्धन पाटील (सोलापूर), रविशेठ पाटील (रायगड), आ. नसीम खान (ठाणे), आ. डी.पी. सावंत (नांदेड व परभणी), आ. रणजित कांबळे (वर्धा), आ. अब्दुल सत्तार (जालना), आ. अमित देशमुख (लातूर व बीड), आ. मधुकरराव चव्हाण (उस्मानाबाद), आ. गोपालदास अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र गावीत (पालघर), पद्माकर वळवी (नंदूरबार), शिवाजीराव मोघे (बुलडाणा व यवतमाळ), वसंत पुरके (अमरावती), नितीन राऊत (नागपूर व भंडारा), नामदेव उसेंडी (गडचिरोली) आदी नेतेही या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

Web Title: Minority panic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.