Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 02:36 PM2019-06-28T14:36:56+5:302019-06-28T17:08:47+5:30

मुंबई  - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या  मुंबईकरांना  पावसाने सकाळपासून मोठा दिलासा दिला आहे. शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली ...

Maharashtra Rain Live Updates : Mumbai's central, western and harbour trains running late, water blogging and traffic jam in some areas | Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

Next

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांना पावसाने सकाळपासून मोठा दिलासा दिला आहे. शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही सेवांवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. तर पावसामुळे मुंबई, पुणे सारख्या शहरात भिंत कोसळणे, झाड पडणे अशा दुर्घटना घडताना पाहायला मिळत आहे. 

पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकलसेवा खोळंबली मध्य रेल्वे 15 मिनिटे उशिराने सुरु, वाढता पाऊस आणि सुट्टी पाहता लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्याची शक्यता आहे. हार्बर रेल्वे 10 मिनिटे उशिराने धावत आहे तर पश्चिम रेल्वे 5 मिनिटे उशिराने आहे. ट्रान्स हार्बर सुरळीत सुरु आहे. 

09:09 PM

मुंबई उपनगरांत पावसाची संततधार; पश्चिम दृतगती मार्गावर कोंडी

अंधेरी, गोरेगाव, मालाडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पश्चिम दृतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.  

07:58 PM

रायगडमध्ये पुढील तासाभरात मुसळधार पावसाची शक्यता

रायगडमध्ये पुढील तासाभरात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज.

07:35 PM

पश्चिम रेल्वेवर 12 तर मध्य रेल्वेवर 21 लोकल रद्द

पश्चिम रेल्वेवर 12 तर मध्य रेल्वेवर 21 लोकल रद्द करण्यात आल्या. यापैकी हार्बर मार्गावर 7 लोकलचा समावेश आहे. तर प.रे. च्या 105 लोकल आणि मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील लोकल 10 ते 20 मिनिटे विलंबाने धावत होत्या. 

06:43 PM

मीरा भाईंदरमध्ये रस्ते पाण्याखाली

06:28 PM

गेल्या 9 तासांत सांताक्रुझमध्ये सर्वाधिक पाऊस

मुंबईमध्ये गेल्या 9 तासांत मुसळधार पाऊस पडला. यामध्ये कुलाब्यामध्ये 26.1 मीमी, ठाण्यात 24.4 मीमी आणि सांताक्रूझमध्ये 140.4 मीमी पाऊस नोंदविण्यात आला. 

06:24 PM

मीरा भाईंदरमध्ये पावसामुळे पाणीच पाणी

05:51 PM

पुण्यात पावसाची जोरदार हजेरी



 

05:45 PM

मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस

05:40 PM

घाटकोपर ते कुर्ला स्थानकादरम्यान रूळावर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत  झाली आहे.

05:33 PM

रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने

05:29 PM

मुंबई : पहिल्याच पावसात शॉक लागून तीन जणांचा मृत्यू

05:17 PM

रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने

05:08 PM

दादरच्या फुल मार्केटमध्ये भिंत कोसळून तीन जण जखमी


04:55 PM

मुंबई : खासगी कंपनीने टाकलेल्या अतिरिक्त भरावामुळे विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान रेल्वेरुळांवर पाणी आले आहे. महापालिकेला याची सूचना देण्यात आली आहे; मध्य रेल्वेची माहिती

04:43 PM

नवी मुंबईत 112 मिमी पाऊस


04:34 PM

मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस

04:27 PM

ठाणे : रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीने, कल्याणकडून येणाऱ्या गाड्या खोळंबल्या

04:17 PM

मुंबईत मुसळधार पाऊस



 

04:09 PM

पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस, 77 मिमी पावसाची नोंद

03:57 PM

पूर्व उपनगरात 91.91 मिमी पावसाची नोंद

03:55 PM

नवी मुंबई : ठाणे - बेलापूर रोड महापे भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्याने पनवेल एसटी बस आणि कार बंद पडली आहे.

03:50 PM

दक्षिण मुंबईत 52 मिमी पावसाची नोंद

03:46 PM

मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे, मिलन सबवे वाहतुकीसाठी बंद


03:42 PM

भंडारा : शहरात जोरदार पावसाला सुरुवात

03:40 PM

चेन्नई एक्स्प्रेस कांजुरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ थांबवण्यात आली

03:35 PM

भांडूप-कांजुरमार्ग रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले

03:32 PM

विमान वाहतूक 25 ते 30 मिनिटे उशिरा

मुंबई -  पावसाची दमदार हजेरी, विमान वाहतूक 25 ते 30 मिनिटे उशिरा

03:32 PM

मुंबई परिसरात मुसळधार पाऊस, सायन आणि हिंदमाता परिसरात पाणी साचलं.


03:29 PM

फुलव पिसारा नाच!

03:28 PM

उल्हासनगरमध्ये नाले ओव्हरफ्लो, नाल्याचे पाणी रस्त्यावरील शेकडो दुकानात शिरले आहे.

03:27 PM

यवतमाळ : पावसादरम्यान पूल वाहून गेला. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प. आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटातील घटना.


 

03:27 PM

मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्गावर पाणी साचण्यास सुरुवात

03:27 PM

पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

पुणे : सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, शहरासह उपनगर भागातही पावसाला सुरुवात

03:27 PM

मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने

नवी मुंबई : वाशी खाडीपुलावर ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने. वाशी खाडीपुलापासून वाशी सेक्टर 17 पर्यंत सुमारे दीड ते दोन किमी वाहनांच्या रांगा

03:26 PM

मुंबईत कोसळधार; उपनगरासह शहरात पावसाला दमदार सुरुवात


03:25 PM

Mumbai Train Update : कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली, मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने


03:24 PM

बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, मुलुंड, ठाणे, दादर अशा भागात मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचलं आहे.


03:21 PM

पावसाचा जोर कायम राहणार

पुढील काही दिवस मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

03:21 PM

मुंबईतल्या धारावी परिसरात पाणी साचल्याने याठिकाणीही वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागला.


03:21 PM

पहिल्याच पावसात मुंबईकर बेहाल; वाहतूक मंदावली तर रेल्वेसेवाही उशिराने


Web Title: Maharashtra Rain Live Updates : Mumbai's central, western and harbour trains running late, water blogging and traffic jam in some areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.