संपाच्या नावावर ग्राहकांची लूट; भाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 05:39 AM2018-06-03T05:39:41+5:302018-06-03T05:39:41+5:30

देशव्यापी शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवक काहीशी घटली. याचा फायदा उचलत किरकोळ बाजारात छोट्या व्यापा-यांनी भाज्यांचे दर वाढविले. ग्राहकांच्या खिशाला यामुळे चाट बसली.

 Looting of customers in the name of the strike; Vegetables | संपाच्या नावावर ग्राहकांची लूट; भाज्या कडाडल्या

संपाच्या नावावर ग्राहकांची लूट; भाज्या कडाडल्या

Next

मुंबई : देशव्यापी शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवक काहीशी घटली. याचा फायदा उचलत किरकोळ बाजारात छोट्या व्यापा-यांनी भाज्यांचे दर वाढविले. ग्राहकांच्या खिशाला यामुळे चाट बसली. मुंबई, ठाणे आदी महानगरांमध्ये संपाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत.
राज्यात शेतक-यांनी दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून आंदोलन सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी १,५०६ वाहनांमधून कृषिमाल विक्रीसाठी आला होता. त्यात सातारा, सांगली, पुणे व नाशिक परिसरामधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आला. मुंबईत टंचाई नसली, तरी किरकोळ व्यापाºयांनी भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढविले.
जळगाव बाजार समितीत टॉमेटोचे भाव दुप्पट तर मिरचीचे दीडपटीने वाढले. ४०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टॉमेटोचे भाव एक हजार ते दीड हजार व हिरवी मिरची १,५०० वरून २,००० ते २,५०० रुपयांवर गेली. नाशिक व अहमदनगरमध्ये शेतकºयांनी कांदा व दूध रस्त्यावर ओतले. कोल्हापूर बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली.

७ जूनपासून शहरांची रसद तोडणार
७ जूनपासून शहरांचा भाजीपाला व दूध पुरवठा थांबविणार असल्याचे किसान संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
शेतकरी संपाला संघर्ष समितीचा पाठिंबा किंवा विरोध नसून फक्त शुभेच्छा असल्याचे किसान महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.
१० जूनला ‘भारत बंद’ करण्याचा इशारा समितीने दिला आहे. सर्व पक्ष आणि संघटनांनी केवळ शेतकºयांसाठी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नवले यांनी केले.

- शेतकरी संपात किसान महासभेसह संघर्ष समिती उतरली नसल्याने, मुंबईतील भाजीपाला व दूधपुरवठ्यावर परिणाम झालेला नाही, असे भायखळा भाजी मार्केटचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी सांगितले आहे.

शेतकरी करीत असलेल्या सर्व मागण्या वाजवी आहेत. मागच्या यूपीए सरकारने केलेल्या गंभीर चुकांमुळेच शेतकरी संकटात सापडला आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्री

प्रसिद्धीसाठी सतत असे करावेच लागत असते. म्हणूनच शेतकरी असे काहीतरी करीत आहेत.
- राधामोहन सिंग, केंद्रीय कृषिमंत्री

Web Title:  Looting of customers in the name of the strike; Vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.