औरंगाबादेत 'ट्रॅक्टरच फॅक्टर'; इम्तियाज जलील आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:46 PM2019-05-23T12:46:07+5:302019-05-23T12:46:07+5:30

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना होत असल्याचे दिसत असले तर हर्षवर्धन देखील आगेकूच करत आहे.

Lok Sabha Election 2019 'Tractor is factor' in Aurangabad; Imtiaz Jalal leads | औरंगाबादेत 'ट्रॅक्टरच फॅक्टर'; इम्तियाज जलील आघाडीवर

औरंगाबादेत 'ट्रॅक्टरच फॅक्टर'; इम्तियाज जलील आघाडीवर

googlenewsNext

मुंबई - देशभरातील लोकसभा निवडणूक भाजप प्रणीत एनडीए सरकार जोरदार कामगिरी करत आहेत. तोच कित्ता एनडीए महाराष्ट्रात देखील गिरवत आहे. गेल्या वेळपेक्षा यावेळी एनडीएची कामगिरी सरस होत आहे. मात्र शिवसेना गड मानला जाणाऱ्या औरंगाबादेत मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे ट्रॅक्टरच फॅक्टर ठरताना दिसत आहे. तर इम्तियाज जलील आघाडीवर आले आहे. त्यामुळे शिवसेनेचा गड धोक्यात असल्याचे चित्र आहे.

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना होत असल्याचे दिसत आहे. तर हर्षवर्धन देखील आगेकूच करत आहे. त्यामुळे लढत हर्षवर्धन, खैरे आणि जलील यांच्यात असली तरी खैरे दोघांपेक्षा मागे दिसत आहेत.

दरम्यान मराठा मोर्चाच्या वेळी मराठा समाजाला दिलेला पाठिंबा हर्षवर्धन यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. मराठा समाज त्यांच्यामागे खंबीरपणे उभा असल्याचे समजते. दुसरीकडे खैरे यांना यावेळी बंडखोरीचे ग्रहन लागल्याचे चित्र आहे. तर जलील यांना मुस्लीम आणि दलितांची एकगठ्ठा मते मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यात काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. एकूण या चुरशीच्या स्थितीमुळे औरंगाबादेत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 'Tractor is factor' in Aurangabad; Imtiaz Jalal leads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.