वहिनीला जाळणा-या दोघांची जन्मठेप कायम

By admin | Published: December 23, 2014 03:16 AM2014-12-23T03:16:43+5:302014-12-23T03:16:43+5:30

महादेव नारायण मोरे आणि जगदेव नारायण मोरे या दोन सख्ख्या भावांना मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही कायम केली आहे.

The lifespan of both of the bridegroom survived | वहिनीला जाळणा-या दोघांची जन्मठेप कायम

वहिनीला जाळणा-या दोघांची जन्मठेप कायम

Next

मुंबई : शेळी विकून आलेले ३११ रुपये दिले नाहीत म्हणून आपल्या वहिनीला तिच्याच घरात रॉकेल ओतून जिवंत जाळणा-या महादेव नारायण मोरे आणि जगदेव नारायण मोरे या दोन सख्ख्या भावांना मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही कायम केली आहे.
महादेव व जगदेव यांनी केलेले अपील फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. दीपक मिश्रा व न्या उदय उमेश लळीत यांच्या खंडपीठाने नमूद केले की, या दोघांनी आपल्याला जाळल्याचा स्पष्ट उल्लेख मयत सुशीलाने दिलेल्या मृत्युपूर्व जबानीत आहे व ही जबानी कायद्याच्या निकषांवर विश्वासार्ह आहे. शिवाय घटनेच्या आदल्या दिवशी या
दोघांनी सुशीला व तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती व त्याचीही रीतसर पोलीस फिर्याद नोंदविण्यात आली होती. त्यावरून दोन्ही आरोपींचा हेतू स्पष्ट होतो.
आरोपींविरुद्ध सबळ पुरावा नाही, असे म्हणून अकोला सत्र न्यायालयाने महादेव सुखदेव यांना १० जुलै १९९१ रोजी निर्दोष मुक्त केले होते. त्याविरुद्ध सरकारने केलेल्या अपिलाचा १६ वर्षांनी निकाल देऊन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या दोघांना जन्मठेप ठोठावली होती. ती आता सर्वोच्च न्यायालयातही कायम झाली आहे. घटना घडली तेव्हा महादेव ४०, तर जगदेव २४ वर्षांचा होता. आता त्यांची वये अनुक्रमे ६४ व ४८ वर्षे झाली आहेत.
ही अमानुष घटना अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहारा गावात घडली होती. तेथे मजूर असलेले महादेव, सुखदेव व जगदेव हे तिघे सख्खे भाऊ शेजारच्या पण स्वतंत्र घरात राहत होते. १७ आॅक्टोबर १९९० रोजी सुखदेव घरात नसताना महादेव या मोठ्या दिराने सुखदेवची पत्नी सुशीला हिला धरून ठेवले व धाकटा दीर जगदेव याने तिच्याच घरातील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले होते. ९१ टक्के भाजलेल्या सुशीलाचा नंतर पाच दिवसांनी इस्पितळात मृत्यू झाला होता. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The lifespan of both of the bridegroom survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.