जालना डेपोमुळे एसटीला तब्बल १९.६३ कोटींचा तोटा

By admin | Published: July 4, 2015 03:02 AM2015-07-04T03:02:08+5:302015-07-04T03:02:08+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तोट्यात आणखी भर पडली आहे. महामंडळाने व्यावसायिकांना जी जागा भाड्याने दिली त्यापेक्षा जास्त जागेवर त्यांनी अतिक्रमण केले

Jalna Depot loses Rs 19.63 crores to STL | जालना डेपोमुळे एसटीला तब्बल १९.६३ कोटींचा तोटा

जालना डेपोमुळे एसटीला तब्बल १९.६३ कोटींचा तोटा

Next

डिप्पी वांकाणी, मुंबई
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तोट्यात आणखी भर पडली आहे. महामंडळाने व्यावसायिकांना जी जागा भाड्याने दिली त्यापेक्षा जास्त जागेवर त्यांनी अतिक्रमण केले असून, यामुळे एसटीच्या तिजोरीला ४७.५६ कोटींचा खड्डा पडला आहे. एकट्या जालना डेपोचा तोटा १९.६३ कोटींचा असून, त्यानंतर नाशिक आणि अमरावतीचा क्रमांक आहे.
महामंडळाच्या दक्षता विभागाने (व्हिजिलन्स डिपार्टमेंट) राज्यातील २५० डेपोंच्या २७६७ ठिकाणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक तपासणी केली. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, या गैरकारभारात महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असून, ते जाणूनबुजून या गैरकारभाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. जालना डेपोची ११२२८.२८ चौरस फूट अतिरिक्त जागा व्यावसायिकांनी वापरल्याचे व त्यामुळे १९.६३ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे यात स्पष्ट झाले. नाशिक डेपोला
५ कोटींपेक्षा जास्त तोटा झाला. रायगड डेपोमध्ये फक्त ४५ चौरस फूट जागेवरच अतिक्रमण होऊन ४,७३२ रुपयांचे नुकसान झाले, असे या पथकाला आढळले. महामंडळाच्या जागांचे संरक्षण करणे व व्यावसायिकांकडून जागेचा जास्त वापर होत असल्यास तो थांबविण्याचे काम अधिकाऱ्यांचे असताना ते केले जात नाही म्हणजे महामंडळाच्या नाकावर टिच्चून हा गैरव्यवहार सुरू होता. हा गैरप्रकार आम्ही महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या निदर्शनास आणून दिला आहे, असे दक्षता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. करार झालेल्या व्यावसायिकाला हे अधिकारी जास्त जागाच केवळ वापरू देतात असे नाही तर ज्या जागेचा वाद न्यायालयात गेला आहे त्या जागेवरही अतिक्रमण करू देतात, असे तो म्हणाला. झालेल्या करारानुसार भाड्यामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ व्हायला हवी; परंतु अनेक ठिकाणी या अटीचे पालन झालेले नाही.

ठिकाणतपासणीजागेचाताब्यातीलभाडेकरूकडून वसूल
झालेलीअतिरिक्तअधिकची जागाकरायचे भाडे
ठिकाणेवापर(चौरस फूट)
मुंबई२२५०४९६.२६१,९१,२४०.००
ठाणे४७३२,७८८.४९५७,९०,०७५.२४
पालघर२८ २०,१५७.०००४,७३२.००
रायगड६४ २०,०४५.००४,७३२.००
रत्नागिरी९७ ५३३,९६१.२५२,३५,३८,९१६.००
सिंधुदुर्ग१०९ ३५७.००१४,०१८.००
पुणे१४६ ६६७,४४१.५०१५,११,६४४.००
सातारा१५० ५१६,५३७.००३२,०९,०५९.००
सांगली११७ १३१,५५२.२१५,३३,३५१.५५
सोलापूर१६२ ७७१३,५३७.००२,७८,७२५०१.००
कोल्हापूर१७७ १४७८७.४०२०,६७,२२४.००
नाशिक१९५ ४१७,६४२.००५,००,६७,४९७.००
धुळे८२ २८११,७३९.१०२६,९८,११४.००
जळगाव१०९ १३१,३४४.२५१,६८,०६०.५०
अहमदनगर१६३ ३१५,३००.९१८९,६८,०८७.००
अमरावती५५ २२६,५५१.६३३,११,२०,९३७.००
अकोला८२ २८९,३१२.००१,८०,३२,२८१.००
यवतमाळ१०२ ३४१६,०४२.५४१,७४,१२,६७८.००
बुलडाणा७५ १२ ३,१५३.००३०,७५,६०४.००
औरंगाबाद६२ १९१५,८४८.७६२,०५,२८,२००.००
नांदेड१०२ ६२८,१२३.१४७५,२८,४२३.००
लातूर१०४ ७३६,९७०.५०२,७८,८७,११५.००
बीड१०५ १४२,६७१.८६३५,६७,७५३.००
परभणी१०१ ५९९,९०६.७५१,३१,०९,९२२.००
उस्मानाबाद८४ ४५४,०८०.८०९३,१३,६१०.००
जालना३४ ०७ ११,२२८.२८१९,६३,४२,४५७.००
नागपूर५७०९३८८.१३८,५६,१९५.००
भंडारा२७०४४१,७०९.००१०,१३,७५६.००
वर्धा४९२५१,११७.००१९,६०,५७७.००
चंद्रपूर-गडचिरोली६०४७,६७५.००२७,३०,३३३.१५
एकूण२७६७८१९२,०८,१६४.७७५४७,५६,२२,९८०.४४

Web Title: Jalna Depot loses Rs 19.63 crores to STL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.