क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने सकल मराठा समाज एकवटला!

By Admin | Published: September 7, 2016 05:03 PM2016-09-07T17:03:44+5:302016-09-07T17:12:04+5:30

मराठा समाजाची बैठक वाशिम येथे ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली होती.

Grant Maratha society together with revolutionary revolution! | क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने सकल मराठा समाज एकवटला!

क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने सकल मराठा समाज एकवटला!

googlenewsNext

नंदकिशोर नारे/ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 7 - कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना फाशी देण्यासोबतच विविध मागण्यांसंदर्भात जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने क्रांती मोर्चाच्या आयोजनानिमित्त सकल मराठा समाजाची बैठक वाशिम येथे ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली होती. मराठा समाजाची कोणतीही संघटना नसल्याने यानिमित्त सकल मराठा समाज एकवटलेला दिसून आला.
येथील वाटाणे मंगल कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये कोणीही बैठकीचा अध्यक्ष, प्रमुख पाहुणा न ठेवता येणारा प्रत्येक जण चटईवर बसून आपापले विचार व्यक्त करत होता. प्रथमताच एवढ्या मोठया प्रमाणात सकल मराठा समाज एकवटल्याचे या बैठकीतून दिसून आले.

Web Title: Grant Maratha society together with revolutionary revolution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.