सरकार शेतक-यांच्या संपात पाडतंय फूट - शिवसेना

By admin | Published: May 17, 2017 02:16 PM2017-05-17T14:16:07+5:302017-05-17T14:16:07+5:30

राज्य सरकार शेतक-यांच्या संपात फूट पाडत आहे. शेतक-यांच्या व्यथेचं राजकारण करत आहे, असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.

Government falls apart from farmers' agitation: Shiv Sena | सरकार शेतक-यांच्या संपात पाडतंय फूट - शिवसेना

सरकार शेतक-यांच्या संपात पाडतंय फूट - शिवसेना

Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - राज्य सरकार शेतक-यांच्या संपात फूट पाडत आहे. शेतक-यांच्या व्यथेचं राजकारण करत आहे, असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी भाजपाला टार्गेट केलं.
 
“सत्तेत असलो तरी आम्ही सध्या देणाऱ्यांच्या नव्हे तर मागणाऱ्यांच्या भूमिकेत आहोत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना विधानसभेवर निर्धार मोर्चा काढणार आहे. आमची कर्जमुक्तीसाठी आरपारची लढाई लढणार आहे”, असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.
 
शेतकऱ्यांनी 1 जूनपासून पुकारलेल्या संपामध्ये उभी फूट पडल्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर एका गटाने संपातून माघार घेतली आहे. तर दुसरा गट मात्र संपावर ठाम आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा नियोजित संप होणार असल्याचं किसान क्रांती संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे.
 
अहमदनगर जिल्ह्यातीलशेतकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र काही शेतक-यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर काहींनी आंदोलनातून माघार घेतली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतक-यांच्या संपात फूट पाडत आहे, असा घणाघात शिवसेनेकडून करण्यात आला आहे. 
 
दरम्यान, शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 19 मे रोजी नाशिकमध्ये शेतकरी अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी विनायकदादा पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

Web Title: Government falls apart from farmers' agitation: Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.