गॉडफादरनेच राधे माँ विरोधात नोंदवली तक्रार

By admin | Published: September 1, 2016 02:24 PM2016-09-01T14:24:22+5:302016-09-01T14:24:22+5:30

त: देवीचा अवतार म्हणवणा-या वादग्रस्त राधे माँ च्या मागे पुन्हा एकदा पोलिस कारवाईचा ससेमिरा लागणार आहे.

The Godfather reported the complaint against Radhe Maa | गॉडफादरनेच राधे माँ विरोधात नोंदवली तक्रार

गॉडफादरनेच राधे माँ विरोधात नोंदवली तक्रार

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १ - स्वत: देवीचा अवतार म्हणवणा-या वादग्रस्त राधे माँ च्या मागे पुन्हा एकदा पोलिस कारवाईचा ससेमिरा लागणार आहे.  यावेळी राधे माँ च्या विरोधात  तिचे गॉडफादर म्हणून ओळखले जाणा-या मनमोहन गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलांना हाताशी धरुन राधे माँ ने मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप मनमोहन गुप्ता यांनी केला आहे. राजवीन आणि संजीव ही मनमोहन गुप्तांची मुले राधे माँ सोबत आहेत.  
 
गुप्ता यांनी बोरीवली पोलिस स्थानकात राधे माँ विरोधात तक्रार दाखल केली. मनमोहन गुप्ता यांनीच राधे माँ ला मुंबईत आणले. आपल्या नंदनवन भवन या तीनमजली इमारतीत त्यांनी राधे माँ च्या निवासाची व्यवस्था केली होती. राधे माँ ने दोन वेगवेगळया नंबरवरुन मला फोन केले व माझ्याच मुलांकरवी मला मारहाण करण्याची धमकी दिली असे मनमोहन गुप्ता यांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 
 
मागच्यावर्षी मनमोहन गुप्ता यांनी राधे माँ आणि आपल्या दोन मुलांना घराचा ताबा सोडण्यास सांगितले. माझी मुले राधे माँ सोबत पंजाबला निघून गेली. पुन्हा ते तिघे आता मुंबईला येत आहेत. त्यांना बोरीवलीतल्या रुमवर रहायचे होते. म्हणून त्यांनी फोन कॉल केला पण मी नकार दिल्यानंतर गुप्ता आणि राधे माँ मध्ये जोरदार वादावादी झाली. 
 
कलम ५०७ अंतर्गत एनसी नोंदवण्यात आली असून, आरोपांची पडताळणी केल्यानंतर पोलिस एफआयआर दाखल करतील. मागच्यावर्षी एका महिलेने राधे माँ विरोधात तक्रार केल्यानंतर ती अडचणीत सापडली होती. हुंडयासाठी सासरकडच्या मंडळींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप पीडित महिलेने राधे माँ वर केला होता. महिलेच्या सासरकडची मंडळी राधे माँ चे भक्त होते. 
 

Web Title: The Godfather reported the complaint against Radhe Maa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.