झाडाला बांधून मुलीवर शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 08:29 PM2016-11-14T20:29:18+5:302016-11-14T20:53:44+5:30

राज्य व देशभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता. कर्जत) येथील शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच सोमवारी अहमदनगर

The girl is tied to a tree and armed with weapons | झाडाला बांधून मुलीवर शस्त्राने वार

झाडाला बांधून मुलीवर शस्त्राने वार

Next

आॅनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. १४-  राज्यासह देशभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता. कर्जत) येथील शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी (ता. श्रीगोंदा) शिवारातील हंगा नदीच्या तिरावर एका मुलीचा झाडाला बांधून विनयभंग करीत धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या घटनेत मुलगी जखमी झाली आहे. 
आपल्या चुलत बहिणीसोबत लघुशंकेसाठी ही शाळकरी अल्पवयीन मुलगी गेली होती. यावेळी अनोळखी तीन बुरखाधारी युवकांनी सोमवारी एका झाडाला बांधून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करीत जखमी केले. तसेच तिचे कपडे फाडले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरविली आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही. 
मिळालेल्या माहितीनुसार या मुली शाळेला सुट्टी असल्याने सकाळी हंगा नदीवर आई व चुलतीसोबत कपडे धुण्यासाठी हंगा नदीवर गेल्या होत्या. त्यानंतर घरी येऊन पुन्हा लघुशंकेसाठी नदीवर गेल्या असता हा प्रकार घडला. हे ठिकाण गावापासून दोन किमी अंतरावर आहे.
अत्याचार झालेली मुलगी आठवीत शिक्षण घेत आहे. या मुलीच्या चुलत्यांच्या मोटारसायकलच्या डिकीत एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत ‘दिवाळीनंतर तुमच्या मुली शाळेत पाठविल्यास त्यांचा घातपात करू’ अशी धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर अवघ्या सहा दिवसातच हा प्रकार घडल्यामुळे मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थ चांगलेच संतापले. त्यांनी पोलीस निरीक्षक सचिन वागंडे यांची भेट घेऊन या प्रकरणाचा छडा लावा, अन्यथा वाडी वस्तीवरील मुली शाळेला कशा जाणार? असा प्रश्न उपस्थित केला.

सत्य उजेडात आणणार ....
मुलीने दिलेल्या जबाबानुसार अनोळखी आरोपींच्या विरोधात भादंवि कलम ३५४, ३२४,३४१ व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. आम्ही तपास सुरू केला आहे. सर्व बाजूंनी तपास करून या प्रकरणातील सत्य उजेडात आणणार आहे.
- सचिन वागंडे,  पोलीस निरीक्षक बेलवंडी.

Web Title: The girl is tied to a tree and armed with weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.