फेसबुवरील ओळखीतून विदेशी महिलेचा नाशिकच्या व्यवसायिकास ४१ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 05:37 PM2018-02-03T17:37:31+5:302018-02-03T17:44:00+5:30

नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिलेने ही रक्कम स्वत:च्या तसेच वेळोवेळी वेगवेगळे बँक खाते क्रमांक देऊन त्यामध्ये जमा करण्यास सांगितले होते़ या प्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात विदेशी महिलेविरोधात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Fisherman's identity fetches 41 lakh of foreign woman's businessman Nashik | फेसबुवरील ओळखीतून विदेशी महिलेचा नाशिकच्या व्यवसायिकास ४१ लाखांचा गंडा

फेसबुवरील ओळखीतून विदेशी महिलेचा नाशिकच्या व्यवसायिकास ४१ लाखांचा गंडा

Next
ठळक मुद्दे नॅस्ट्रोजेन सीडस् : विदेशी डॉक्टर महिला इलेक्ट्रिक व्यवसायिकास गंडा : गुन्हा दाखल

नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिलेने ही रक्कम स्वत:च्या तसेच वेळोवेळी वेगवेगळे बँक खाते क्रमांक देऊन त्यामध्ये जमा करण्यास सांगितले होते़ या प्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात विदेशी महिलेविरोधात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर परिसरातील सुयश टेरेस अपार्टमेंटमधील रहिवासी प्रमोद पांडूरंग मोरे (४७) यांचा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय असून त्यांनी इंडिया मार्ट या साईटवर नोंदणी केली आहे़ युनायटेड किंग्जडम येथील संशयित डॉ़ख्रिस्ती जून्स या महिलेने जून २०१७ ते आतापर्यंत +४४७५३४९९३८५४ व ४४७५५४९६३२८९ या क्रमांकावरून मोरे यांना फोन केला व केंट फार्मास्युटीकल्स (यूक़े़)कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नॅस्ट्रोजेन सीड्स या बियांची मागणी केली़ मात्र, याबाबत माहिती नसल्याने त्यांनी या महिलेकडे विचारणा केली असता तिने दिल्लीतील प्रियंका शर्मा या महिलेचा मोबाईल नंबर दिला़
प्रियंका शर्मा या महिलेच्या मोबाईलवर ०८३७५८७६९४९ संपर्क केल्यानंतर तिने दिल्लीतील ग्लोबल एंटरप्रायजेसमधून बोलत असल्याचे सांगितले़ यानंतर बियांची पाकिटे खरेदी करण्यासाठी १ लाख २८ हजार रुपये दिल्लीतील आयसीआयसीआय बँकेच्या खाते क्रमांक ०७२००५००१५७७ मध्ये भरण्यास सांगून नॅस्ट्रोजेन सीड्स या बियांच्या व्यापाराची व बियांची माहिती देऊन विश्वास संपादन केला. यानंतर मोरे यांनी आपल्या पिंपळगाव बसवंत येथील खासगी बँकेतील खाते क्रमांक ०७०१२१२००००३८५ वरून आरटीजीएस केली़
संशयित डॉ़ख्रिस्ती ज्यून्स हिने मोरे यांना आपल्या मॉरिस मूर नावाच्या कंपनीतून बायहॅण्ड पर्चेस आॅर्डर देतो असे सांगितले़ त्यानुसार मुंबईतील गोरेगाव स्टेशन येथून त्यांना मिळालेल्या आॅर्डरमध्ये बियांची आणखी २० पाकिटे घेण्यास सांगण्यात आले व वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले़ त्यानुसार मोरे यांनी जून २०१७ ते आजपर्यंत वेगवेगळ्या बँक खात्यावर ४१ लाख ६४ हजार ५९५ रुपये भरले आहेत़ परदेशी डॉक्टर महिलेने विश्वास संपादन करून बियांच्या व्यापाराच्या नावाखाली फसवणूक केल्याचे लक्षात येताच मोरे यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़

Web Title: Fisherman's identity fetches 41 lakh of foreign woman's businessman Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.