‘लठ्ठ महिलांना जगण्याचा हक्क नाही', ट्विटने महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 05:55 PM2017-11-22T17:55:24+5:302017-11-22T17:56:24+5:30

लठ्ठ म्हणून उल्लेख केल्याने आपला विनयभंग झाल्याची तक्रार मुंबईच्या एका 32 वर्षीय महिलेने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात केली आहे.

'Fat women do not have the right to live', molestation of women by tweeting; Filed the complaint | ‘लठ्ठ महिलांना जगण्याचा हक्क नाही', ट्विटने महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

‘लठ्ठ महिलांना जगण्याचा हक्क नाही', ट्विटने महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

Next

मुंबई :  लठ्ठ असा उल्लेख केल्याने आपला विनयभंग झाल्याची तक्रार मुंबईच्या एका 32 वर्षीय महिलेने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात केली आहे. दादर येथील रहिवासी असलेल्या या महिलेने तक्रार केली आहे. राजावेल करिकरन या नावाच्या इसमाने हे ट्विट केल्याची माहिती असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
राजावेल नावाच्या अकाऊंटवरून ‘लठ्ठ महिलांना जगण्याचा हक्क नाही' असं मत व्यक्त करण्यात आलं होतं. त्यावर या महिलेने त्याच्या विरोधात मत व्यक्त केलं.  दोघांमध्ये या मुद्दयावरून तिखट चर्चा झाली व दोघांमधला हा वाद वाढत गेला. दरम्यान त्या व्यक्तीने घाणेरड्या भाषेचा वापर केल्याची तक्रार महिलेने केली. 
महिलेच्या तक्रारीनुसार भादंवी कलम 354 नुसार पोलिसांनी अनोळखी इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. एसीपी सुनील देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. 
ज्या ट्विटर अकाऊंटवरून ही शेरेबाजी करण्यात आली आहे ते अकाऊंट बनावट आहे की खरे हे देखील तपासावे लागेल, असं देशमुख म्हणाले. शिवाय ट्विट करणारी व्यक्ती आफ्रीका खंडातील असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Web Title: 'Fat women do not have the right to live', molestation of women by tweeting; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.