शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही- एकनाथ शिंदे

By admin | Published: May 1, 2016 04:24 PM2016-05-01T16:24:38+5:302016-05-01T16:31:43+5:30

दुष्काळामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.

Farmer is in the field, not in the camps of drought victims - Eknath Shinde | शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही- एकनाथ शिंदे

शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही- एकनाथ शिंदे

Next

ऑनलाइन लोकमत, 

ठाणे, दि. 1- शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही, असे सांगत आपल्याला अन्न-वस्त्र-निवारा पुरवणा-या शेतक-यांवर दुष्काळामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता  असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. महिन्याभरापूर्वी ठाण्यात दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या दुष्काळ छावण्या ही ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना दिलेला आधार होता. याचे सर्वच स्तरावर कौतुक झाले असले तरीही शेतकऱ्यांवर अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पाण्याच्या बाबतीत ठाणे जिल्हा स्वयंपूर्ण होण्याकडे लक्ष केंद्रित केलं असून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडला पाहिजे, जमिनीत जिरला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट असणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ठाणे जिल्ह्यापासून याची सुरुवात केली असून, जिल्ह्यासाठी हक्काचं, स्वतःचं असं धरण तातडीने बांधण्याच्या गरजेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.ठाणे जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या धरणांची डागडुजी, तलावांची साफसफाई, पावसाचं वाहाणारं पाणी अडवून स्थानिक पातळीवर जलसाठे निर्माण करणे, त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद करून तलावांची साठवण क्षमता वाढवणे तसेच, दुर्लक्षित अवस्थेतील जिल्ह्यातली छोटी छोटी धरणं, बंधारे यांचा वापर करुन घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
आपल्या जिल्ह्यातले कृषी खात्याचे अधिकारी चांगलं काम करत असून त्यांची मेहनत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कृषी अधिकाऱ्यांनी सेंद्रीय शेतीचे फायदे शेतक-यांना समजावून सांगितले पाहिजेत. सेंद्रिय पिकांना आज अनेक ठिकाणी दुप्पट-तिप्पट भाव मिळतो याचा फायदा शेतक-यांना होऊ शकेल, असे श्री. शिंदे म्हणाले. आपला शेतकरी बांधव आज अत्यंत कठिण परिस्थितीतून जात असून त्याला विश्वास देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ५७ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Farmer is in the field, not in the camps of drought victims - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.