विक्रमगड तालुक्यात वीज गुल!

By Admin | Published: July 31, 2016 03:05 AM2016-07-31T03:05:10+5:302016-07-31T03:05:10+5:30

मुसळधार पाऊस बरसत असल्याने त्याचा परिणाम म्हणून विक्रमगड परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल २० तास वीज गायब होती.

Electricity gear in Vikramgad taluka! | विक्रमगड तालुक्यात वीज गुल!

विक्रमगड तालुक्यात वीज गुल!

googlenewsNext


विक्रमगड : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने त्याचा परिणाम म्हणून विक्रमगड परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल २० तास वीज गायब होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजता वीज गायब झाली ती रात्री १० वाजताच आली. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ६ वाजता वीज गायब झाली ती दुपारी 3 वाजताच आली. त्यामुळे यादरम्यान जवळजवळ २० तास वीज गायब होती तर पावसाळयात उपलब्ध वीज पुरवठयात सातत्य नसल्याने वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रकारात भरमसाट वाढ झाल्याने महावितरणाच्या विरोधात वीज ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे़
दरम्यान, हे प्रकार होण्यामागे गेल्या अनेक वर्षाची जुनी असलेली वहन यंत्रणा व एका सेक्शन कार्यालयाची व कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता हे आहे. सध्या संपूर्ण तालुक्याचा भार हा एकच कार्यालयावर असून त्यामध्येही अवघे ७ ते ८ कर्मचारी काम करीत असल्याने सर्व ठिकाणी वेळेवर पोहचून सेवा देणे शक्य होण्यासारखे नाही़ त्यातच जुनी यंत्रसामुग्रीने वारंवार बिघाड होत असते़ येथे नवीन अजून एक सेक्शन कार्यालयाची निर्मिती व्हावी, अशी मागणी होत आहे़
काही भागात रात्रभर वीज गायब असते तर काही भागात विजेचा पुरेसा दाब नसल्याने ती डिम असते़ सद्यस्थितीत गेल्या काही दिवसांपासून मिनिटाला वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात, त्यातच दुरुस्तीच्या नावाखाली आठवडयातील दर शुक्रवारी वीज बंद ठेवली जाते़ दिवभर वीज बंद ठेवून महावितरण कोणती कामे करतात? कामे करतात तर मग असे प्रकार का घडतात? असा सवालही उपस्थित केला जात आहे़
विक्रमगड तालुक्यातील वीजेची समस्या सोडविण्यासाठी तालुका निर्मीतीनुसार २६ जानेवारी २००९ रोजी महावितरण उप विभागीय कार्यालय (उप कार्यकारी अभियंता) सुरु करण्यांत आले़ परंतु त्यामध्ये देण्यात आलेला कर्मचारी वर्ग हा खुपच अपुरा असल्याने व या कार्यालयामध्ये तालुका निर्मितीपासूनच सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील वीज ग्राहकांना सुविधा पुरवितांना उपलब्ध कर्मचारी वर्गावर मोठा ताण पडत असून त्याना एकप्रकारे तारेवरची कसरतच करावी लागत असते. तसेच त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षापासून पाहावयास मिळत आहे़
विक्रमगड शहरातील २५ हजार व तालुक्यातील २५ हजार अशा ५० हजार वीज ग्राहकांसाठी अवघे ८ कर्मचारी असल्याने वीज समस्या कायम आहे़ त्यामुळे येथील उपविभागीय कार्यालय हे नुसते नावापुरते असल्याचा आरोप वीज ग्राहक करीत आहेत़
विक्रमगड शहरातील ओंदे वीजकेंद्रातून साखरा, विक्रमगड व आलोंडा असे तीन ट्रान्सफार्मर व त्याअंतर्गत गाव खेडयापाडयांना वीज पुरविली जाते़ हा संपूर्ण तालुका आदिवासी असल्याने व त्यातील वीज यंत्रणा सुधारणे व पुरवठा वाढविणे यासाठी स्वतंत्र निधी मिळणे शक्य असूनही तसे प्रयत्न मात्र होत नाहीत. त्याचा फटका जनतेला बसतो आहे.
(वार्ताहर)
>अशी आहे दुरवस्था यंत्रणेची
एल टी लाईन १३०० कि़ मी च्यावर,एस टी लाईन ३८० कि़ मी़ व ३३ के़ व्ही ४० कि ़मी असल्याने विक्रमगड हा दुर्गम व जंगल पटटयाचा भाग असल्याने पावसाळयात या लाईनमध्ये अथवा ट्रान्सफार्मरमध्ये काही बिघाड झाल्यास वीज खंडीत होण्याचे प्रकार घडत असतात़
महावितरणाच्या विक्रमगड शाखेतंर्गत असलेल्या २५ हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी केवळ ८ कर्मचारी असून त्यांच्याकडून ग्राहकसेवांची अपेक्षा पूर्ण होत नसल्याने तर या कर्मचाऱ्यांना पावसाळयात वीजेची समस्या जटील
होत असल्याने तीन फिडरची लाईन ब्रेक झाल्यास
त्याची दुरुस्ती करण्यास या कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्याने कर्मचारी संख्या तत्काळ वाढविण्याची मागणी
ग्राहकांनी केली आहे़

Web Title: Electricity gear in Vikramgad taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.