पुन्हा महाराजांचा अपमान केला तर भाजपचा 'बी' देखील राज्यात उरणार नाही : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 03:40 PM2018-02-20T15:40:21+5:302018-02-20T15:40:55+5:30

ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशिर्वाद घेऊन हे सरकार आले त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यांनी जाहिराती का दिल्या नाहीत

Don't again insult Shivaji Maharaj else BJP will finish in Maharashtra warns Dhananjay Munde | पुन्हा महाराजांचा अपमान केला तर भाजपचा 'बी' देखील राज्यात उरणार नाही : धनंजय मुंडे

पुन्हा महाराजांचा अपमान केला तर भाजपचा 'बी' देखील राज्यात उरणार नाही : धनंजय मुंडे

Next

रावेर ( जळगाव ) : मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागात अत्यंत वाईट पद्धतीने पंचनामे होत आहे. शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते, त्या पाटीवर शेतकऱ्याबाबत माहिती लिहिलेली असते. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. माझा शेतकरी चोर आहे का ? असा संतप्त सवाल राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला. तसंच शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या भाजपाच्या श्रीपाद छिंदम याच्यावर टीकेची झोड उठवताना मुंडेंनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला.  

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनानिमित्त रावेर येथे जाहीर सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते. आठवड्याभरापूर्वी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांंना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात सरकारतर्फे सुरू असलेल्या अवमानकारक पंचनाम्यावरून धनंजय मुंडे यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ज्या छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन जो पक्ष सत्तेत आला त्याच पक्षाचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरतात. त्याच भाजपाचा ना पदाधिकारी, ना नेता, ना मुख्यमंत्री कोणीही साधी खंतही व्यक्त केली नाही. या पुढे जर महाराजांचा अपमान केलात तर भाजपचा बी देखील राज्यात उरणार नाही असा इशारा मुंडेंनी दिला. मॅगनेटीक महाराष्ट्राचा मोठा इव्हेंट मुंबईत पार पडला. त्या इव्हेंटच्या प्रत्येक वृत्तपत्राला मोठ्या जाहिराती सरकारने दिल्या मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची एकही जाहिरात सरकारने दिली नाही. मी मुख्यमंत्र्यांना सवाल विचारू इच्छितो की, ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशिर्वाद घेऊन हे सरकार आले त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यांनी जाहिराती का दिल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला. काल संपूर्ण विश्वभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली मात्र संघाच्या एकाही शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली नसल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला.

यावेळी सौ. सुप्रियाताई सुळे, दिलीप  वळसे पाटील, गफार मलिक यांची भाषणे झाली. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, भास्कर जाधव, माजी आमदार अरुण पाटील, सौ चित्राताई वाघ उपस्थित होते.

Web Title: Don't again insult Shivaji Maharaj else BJP will finish in Maharashtra warns Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.