गणेशोत्सवाच्या तयारीसाठी भक्तांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 03:17 AM2017-08-19T03:17:16+5:302017-08-19T03:17:26+5:30

काही दिवसांवर आलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागलेत.

Devotees of devotees to prepare for Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या तयारीसाठी भक्तांची लगबग

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी भक्तांची लगबग

Next

- रीना चव्हाण
काही दिवसांवर आलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागलेत. श्री गणेशाचे आगमन होणार या विचाराने घरात प्रसन्न वातावरणाबरोबर सजावट, सफासफाईची तारांबळ उडते. आजकाल बरेच जण नोकरीला असल्याने नोकरी सांभाळून सण, उत्सव साजरे केले जातात. पण वेळ नाही या सबबीखाली हे काम आज नाही तर उद्या- परवा असे आपण टाळतो. नाहीतर शनिवार - रविवार बघू. पण आता गणेशाचे आगमन काही दिवसांवर असल्याने अशी टाळाटाळ करुन चालणार नाही. नाहीतर आयत्यावेळेला तुमचाच गोंधळ होईल.
>वेळ निश्चित करा
आज वा उद्या आपल्याला काय काम करायचेय याची रुपरेषा आखा. घरातील प्रत्येक खोली स्वच्छ करायची म्हणजे कचरा काढण्याबरोबर लादी स्वच्छ करणे, पडदे, चादरी बदलणे हे आलेच. कारण हे काम आज पूर्ण करायचेय हे ठरविले तरच तुम्ही काम लवकरात लवकर कराल. तसेच बाथरुमच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. कारण यादरम्यान घरात पाहुण्यांची रेलचेल मोठ्याप्रमाणात असते. त्यामुळे बाथरुममधील लादी स्वच्छ ठेवा. तेथील कपाटात आवश्यक त्या वस्तू म्हणजे साबण, नॅपकीन, शॅम्पू,तेल ठेवा, आरसा पुसून घ्या. बाथरुममध्ये दुर्गंध येऊ नये म्हणून एअर फ्रेशनरचे पॅकेट लावा. जेणेकरुन वातावरण सुगंधी राहील.
>घराची स्वच्छता
नोकरी -व्यवसायानिमित्त बाहेर जाणा-या व्यक्तींनी वेळ नाही असे म्हणून काम पुढे ढकलण्याऐवजी दररोज थोडंथोडं काम करण्याला प्राधान्य द्यावे. निदान ४ -५ दिवस आधी घराची साफसफाई करावी. ज्यामुळे शेवटच्या क्षणी गोंधळ होणार नाही.
>कामाची करा विभागणी
सण-उत्सव म्हटला की बरीच कामं असतात. विशेषत: श्री गणेशाचे आगमन म्हटले की साफसफाई, सजावट, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविणे, येणा-या-जाणा-या पाहुण्यांचा पाहुणचार यामुळे आयत्यावेळी बºयाचशा गोष्टी विसरायला होतात. त्यासाठी कामांची एक यादी बनवून घरातील सदस्यांमध्ये कामे वाटून घ्या.
>स्वयंपाकघराची स्वच्छता
स्वादिष्ट व्यंजन बनविण्याबरोबर स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे आहे. किचन बॉक्स स्वच्छ करा. नको असलेले सामान फेकून द्या. वस्तू जागच्याजागी ठेवा म्हणजे पाहिजे असतील तेव्हा वेळेत मिळतात. कारण श्रीगणेशाचे आगमन झाल्यावर विविध व्यंजन स्वयंपाकघरात बनविले जातात. त्यासाठी आवश्यकत्या वस्तू लगेच मिळणे गरजेचे असते.
>धावपळ टाळण्यासाठी वेग वाढवा
काही दिवसांवर बाप्पाचे आगमन आल्याने एक दिवस एक काम करु अशा भ्रमात राहू नका. वेळ थोडा आणि काम जास्त असल्याने कामांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. जेणेकरुन बाप्पाच्या आगमनाच्यावेळी तुमची धावपळ होणार नाही.
>सजावट, आरास करा निश्चित
बाजारात वेगवेगळ्या आकारातल्या थर्माकोल, फुलांच्या आरास मिळतात. पण आपल्या कल्पकतेचा उपयोग करुन फुले, माळा, रेशीम लड्या, पताका, लाइटचा उपयोग करुन छान आरास बनविता येते. पण त्यापूर्वी बाप्पाची मूर्ती मखरात की मोकळ्या जागी ठेवणार आहात हे निश्चित करा. कारण मूर्ती ठेवल्यावर आजूबाजूला किती जागा शिल्लक राहते हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जागा लहान असेल तर मखरातील रंगसंगतीच्या भडकपणामुळे बाप्पाचे मूळ सौंदर्य नष्ट होते. जागा मोठी असेल आणि मूर्तीही मोठी असेल तर ती शक्यतो मोकळीच ठेवावी.

Web Title: Devotees of devotees to prepare for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.