ठेंगण्या पुलाच्या दुरूस्तीला ‘ठेंगा’

By admin | Published: July 19, 2016 01:48 AM2016-07-19T01:48:48+5:302016-07-19T01:48:48+5:30

गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम,

Dengue | ठेंगण्या पुलाच्या दुरूस्तीला ‘ठेंगा’

ठेंगण्या पुलाच्या दुरूस्तीला ‘ठेंगा’

Next

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम, अतिदुर्गम भागाशिवाय मुख्य रहदारीच्या रस्त्यावरही असलेल्या कमी उंचीच्या ठेंगण्या पूलांची दुरूस्ती करण्याकडे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या अरूंद व ठेंगण्या पूलावर अपघात होऊन आतापर्यंत जिल्ह्यात ३०० वर अधिक लोकांचे बळी गेल्या तीन-चार वर्षात गेलेले आहेत. सध्या फक्त कठाणी नदीचा पूल नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय आणखी आठ ते दहा ठेंगणे पूल जिल्ह्यात असून त्यांची उंची वाढविण्याबाबत शासनस्तरावरून प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. या पुलांमुळे दरवर्षी पावसाळ्यात पुलावर पाणी चढल्याने रस्ता बंद होण्याची स्थिती निर्माण होते.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून चंद्रपूर-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव तसेच गडचिरोली- आरमोरी- देसाईगंज-गोंदिया हे आंतरराज्य व राज्य महामार्ग आहेत. या व चंद्रपूर-अहेरी या महामार्गावर बोरी गावाजवळ दिना नदीचा पूल आहे. हा पूल अरूंद व ठेंगणा आहे. येथून अनेकदा वाहन पडतात. येथे आतापर्यंत ८ ते ९ अपघात झाले व अनेकांचा बळीही गेला आहे. याशिवाय गोंडपिपरी-आष्टी दरम्यान असलेल्या वैनगंगा नदीच्या पूलावरूनही वाहन पडल्याच्या अनेक घटना घडल्या. व यातही अनेकजणांचे बळी गेले आहेत. तसेच नागपूर-गडचिरोली मार्गावर आरमोरी तालुक्यात ठाणेगाव जवळील गाढवी नदीच्या पूलावर वाहन कोसळल्याने आतापर्यंत १५ अपघात झाले आहे. मात्र यापैकी कुठल्याही पूलाची दुरूस्ती करण्यात आलेली नाही तसेच हे पूल उंच करण्याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आलेला नाही. गडचिरोलीचा वारंवार संपर्क पूर आल्यानंतर मुख्यालयाशी तुटत होता. याला कठाणी नदीचा ठेंगणा पूल कारणीभूत ठरला होता. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी लक्ष घालून हा पूल उंच करण्याचे काम हाती घेतले आहे. १५ कोटी रूपये या कामासाठी मंजूर केले. आता या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलाचे कामही मंजूर करण्यात आले होते. मात्र त्याचे घोडे अजुनही रखडलेलेचे आहे. यासोबत १० ठेंगणे पूल पावसाळ्यात वाहतूक रोखण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात या पुलाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह असून राष्ट्रीय महामार्गाचेही काम अधांतरीच दिसत आहे.

३ वर्षांत २९० अपघातांमध्ये ३३७ लोकांचा बळी
४२०१० मध्ये ९५ अपघातात १०६ जण मरण पावले. २०११ मध्ये ९७ अपघातात १०७ जण तर २०१२ मध्ये ९८ अपघातात १२४ जण मरण पावले आहेत. आष्टीजवळ वैनगंगा नदीच्या ठेंगण्या पूलावरून अनेक वाहने आजवर पडलीत. यात अनेकांचा बळी गेला. तसेच अहेरी मार्गावर दिना नदीच्या पूलावरही काही वर्षापूर्वी मेटॉडोर वाहून गेला होता. यातही ६ ते ७ लोकांचा बळी गेला होता. परंतु तरीही या पूलांची दुरूस्ती झालेली नाही.

Web Title: Dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.