मुंबई शहरात पाण्याचे दुर्भिक्ष गडद

By Admin | Published: September 13, 2015 02:46 AM2015-09-13T02:46:41+5:302015-09-13T02:46:41+5:30

महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत २६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यामुळे सर्व सेवा जलाशयांमध्ये दैनंदिन स्वरूपात जेवढे पाणी पुरविण्यात

Darkness of water in the city of Mumbai is dark | मुंबई शहरात पाण्याचे दुर्भिक्ष गडद

मुंबई शहरात पाण्याचे दुर्भिक्ष गडद

googlenewsNext

मुंबई : महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत २६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यामुळे सर्व सेवा जलाशयांमध्ये दैनंदिन स्वरूपात जेवढे पाणी पुरविण्यात
येत होते; त्यात १५ टक्के कपात
लागू करण्यात आली आहे. याबाबत जल अभियंता खात्याने संनियंत्रण (मॉनिटरिंग) करावयाचे असून, त्याबाबतचा अहवाल नियमितपणे सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले
आहेत.
मुंबईत असलेल्या सेवा जलाशयांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात लागू असलेली १५ टक्के पाणीपुरवठा कपात ही निश्चित स्वरूपाची आहे, तर पाणीपुरवठ्याच्या कालावधीमध्ये २० टक्के कालावधी कपात लागू आहे. परंतु तांत्रिक आवश्यकतेनुसार कालावधीमध्ये बदल करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. म्हणजेच उंचावरील परिसर
किंवा सखल परिसर, अशा
परिसरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे नागरिकांना पाणी मिळण्यास
अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये विभागीय स्तरावर बदल करता येऊ शकतो, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
पालिकेच्या सर्व २४ विभागांचे सहायक आयुक्त त्यांच्या विभागातील सहायक अभियंत्यांशी समन्वय
साधून विभागातील ज्या परिसरांमध्ये अत्यंत कमी पाणीपुरवठा होत
असेल ती ठिकाणे निश्चित
करतील. तसेच संबंधित ठिकाणास पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा वेळेमध्ये आवश्यक तो बदल करू शकणार आहेत. उंच भाग व सखल भागांना आवश्यकतेनुसार वेगळ्या स्वरूपातील पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने जल अभियंता खात्याद्वारे कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

बैठका नकोत : सहायक अभियंत्यांना त्यांच्या विभागातील पाणीपुरवठा विषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी अधिक वेळ देता यावा, यासाठी त्यांना विविध बैठकांना, पाहणी दौऱ्यांना बोलाविण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

सोसायट्यांना नोटीस
ज्या सोसायट्यांना नियमानुसार मलनि:सारण प्रक्रिया संयंत्र उभारणे व त्याद्वारे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठी करणे बंधनकारक आहे त्यांच्याकडून अशा प्रकारे पुनर्वापर करण्यात येत नसेल तर अशा सोसायट्यांना संबंधित सहायक आयुक्तांनी नोटीस द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

विहिरींची यादी तयार करा : उप आयुक्त व सहायक आयुक्तांनी संबंधित विभागातील खासगी व सार्वजनिक जागांवरील कूपनलिका, विहिरीसारख्या पाणीसाठ्यांची यादी तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या यादीमध्ये संबंधित पाणीसाठ्याच्या ठिकाणांचे पत्ते, मालकीबाबतचा तपशील व पाणी गोडे आहे अथवा खारे या माहितीचा तपशील असणे आवश्यक असणार आहे.

युद्धस्तरावर कार्यवाही करा
दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्यांबाबत जल अभियंता खात्याने युद्धस्तरावर कार्यवाही करावी आणि आवश्यक ती उपाययोजना तत्काळ अंमलात आणावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Darkness of water in the city of Mumbai is dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.