धक्कादायक! दिवाळीचा बोनस नाही दिला, कामगारांनी मालकाचा खून केला  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 03:09 PM2023-11-12T15:09:22+5:302023-11-12T15:10:00+5:30

Crime News: दिवाळीचा बोनस देण्यास नकार दिल्याने दोन कामगारांनी ढाबा मालकाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ही घटना घडली.

Crime News Nagpur: Shocking! Diwali bonus not given, workers kill owner | धक्कादायक! दिवाळीचा बोनस नाही दिला, कामगारांनी मालकाचा खून केला  

धक्कादायक! दिवाळीचा बोनस नाही दिला, कामगारांनी मालकाचा खून केला  

दिवाळीचा बोनस देण्यास नकार दिल्याने दोन कामगारांनी ढाबा मालकाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे नाव राजू ढेंगरे असून, त्याची बोनस नाकारल्यानंतर दोन कामगारांनी त्याची बेदम मारहाण करून तसेच गळा आवळून आणि चाकूने भोसकून हत्या केली.

या घटनेनंतर मध्य प्रदेशमधील रहिवासी असलेले आरोपी छोटू आणि आदी हे फरार आहेत. मृत ढेंगरे याने एका ठेकेदाराच्या माध्यमातून आरोपींना कामावर घेतले होते. पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दिवाळीसाठी पैसे आणि बोनसवरून ढेंगरे आणि छोटूमध्ये वाद झाला होता. ढेंगरे यांनी आरोपींना पैसे देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र थोडे नंतर पैसे देतो, असे त्यांनी आरोपींना सांगितले आणि ते खाटेवर जाऊन झोपले. त्यानंतर आदी आणि छोटू यांनी त्यांचा गळा आवळला. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर वजनदार वस्तूने वार केला. तसेच धारदार हत्याराने हल्ला केला. 

दरम्यान, मृत ढेंगरे हे कुही तालुक्यातील सूरगावचे माजी सरपंच होते. तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही ते विजयी झाले होते. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक दृष्ट्या या हत्येमागे आर्थिक कारण दिसत आहे. मात्र राजकीय वैमनस्याच्या दृष्टीनेही तपास केला जात आहे.  

Web Title: Crime News Nagpur: Shocking! Diwali bonus not given, workers kill owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.