तेलगी प्रकरणी शरद पवारांविरोधात तक्रार करणार - अनिल गोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:15 AM2017-12-09T05:15:33+5:302017-12-09T05:15:50+5:30

तेलगी घोटाळ्यात शरद पवार, छगन भुजबळ दोषी असल्याचा आरोप भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे़ शरद पवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे गोटे यांनी सांगितले.

Complaint against Sharad Pawar in Telgi case - Anil Gotte | तेलगी प्रकरणी शरद पवारांविरोधात तक्रार करणार - अनिल गोटे

तेलगी प्रकरणी शरद पवारांविरोधात तक्रार करणार - अनिल गोटे

Next

धुळे : तेलगी घोटाळ्यात शरद पवार, छगन भुजबळ दोषी असल्याचा आरोप भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे़ शरद पवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे गोटे यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी गोटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांची आमने- सामने पत्रकार परिषद झाली़
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा-लोकसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला तेलगी प्रकरणावर चर्चेला सुरुवात झाली़ मनोज मोरे यांनी, तेलगी प्रकरणात आमदार गोटे चार वर्षे कारागृहात होते हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे सांगितले़
त्यानंतर आमदार गोटेंनी तेलगीच्या नार्को टेस्टमधील जबाबात त्याने घेतलेल्या नेत्यांच्या नावांचा संदर्भ देत विविध कागदपत्रे दाखविली़ तसेच मोपलवारदेखील तेलगी प्रकरणात जामिनावर सुटल्याचेही ते म्हणाले़

Web Title: Complaint against Sharad Pawar in Telgi case - Anil Gotte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.