खडसेंच्या उद्विग्नतेवर मुख्यमंत्र्यांची मलमपट्टी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:17 AM2018-03-07T06:17:57+5:302018-03-07T06:17:57+5:30

‘माझ्याविरुद्ध आतापर्यंत एकही आरोप सिद्ध झाला नाही पण ३५-४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आरोप ज्यांनी लावले त्यांचे काय, त्यांच्यावर सरकार कुठली कारवाई करणार आहे, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला.

 Chief Minister's bandage on Khadse's tragedy | खडसेंच्या उद्विग्नतेवर मुख्यमंत्र्यांची मलमपट्टी  

खडसेंच्या उद्विग्नतेवर मुख्यमंत्र्यांची मलमपट्टी  

Next

मुंबई  - ‘माझ्याविरुद्ध आतापर्यंत एकही आरोप सिद्ध झाला नाही पण ३५-४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आरोप ज्यांनी लावले त्यांचे काय, त्यांच्यावर सरकार कुठली कारवाई करणार आहे, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला. त्यावर, ‘अनेकदा खोटया तक्रारी करून लोकप्रतिनिधींना बदनाम केले जाते हे मान्य करताना अशा प्रकरणी सभागृहातील गटनेत्यांची बैठक घेण्यात येईल, अशी मलमपट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
चौकशीत दोषी असेल तर फासावर द्या, पण असे आरोप करणाºयांवर सरकारने काय कारवाई केली अशी विचारणा खडसे यांनी केली तेव्हा मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित होते. खडसे म्हणाले की, माझ्या पीएने ३० कोटींची लाच घेतल्याची बदनामी करण्यात आली. चौकशीत काहीही आढळले नाही. मंत्रिपदी असताना अनेक आरोप झाले. दोन वर्षे मी चौकशीच्या फेºयात अडकलो.सीआयडी, एसीबी, लोकायुक्त सर्व चौकशा झाल्या. जनतेसमोर नाथाभाऊ का नालायक आहे हे भासवण्याचा खोडसाळपणा काही जणांनी केला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावर मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा खोटया तक्रारी करून लोकप्रतिनिधींना बदनाम केले जाते हे मान्य करताना अशा प्रकरणी सभागृहातील सदस्यांनी एकत्र बसून विचार केला पाहिजे. याबाबत काय कारवाई करता येऊ शकेल यावर नियम तपासले जातील. यासंदर्भात गटनेत्यांची बैठक घेउन मार्ग काढण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले.

हितेंद्र ठाकूर आक्रमक
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कथित आॅडिओ क्लिपवरून होत असलेल्या आरोपांबाबत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवेदन करीत खोटे आरोप करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली. स्वत:सोबतच इतरांवरही जे बेछूट आरोप होतात त्यांचा पाढाच त्यांनी वाचला. आरोपांमध्ये तथ्य असेल तर निश्चित कारवाई करा. पण सरसकट बदनामी कशाला, असा सवाल त्यांनी केला.

Web Title:  Chief Minister's bandage on Khadse's tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.