Raosaheb Danve : "जिसकी जितनी संख्या भारी…"; शिवसेनेचा प्रमुख कोण?, रावसाहेब दानवेंनी स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 10:45 AM2022-07-20T10:45:44+5:302022-07-20T11:02:51+5:30

BJP Raosaheb Danve And Shivsena : विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाशी युती न करणं हे जनतेलाच नव्हे तर आमदार आणि खासदारांनाही पसंत नव्हतं. पण शिवसेनेने सत्तेसाठी भाजपाला फसवल्याचा आरोप देखील यावेळी दानवे यांनी केला आहे. 

BJP Raosaheb Danve reaction over Maharashtra Political situation and shivsena | Raosaheb Danve : "जिसकी जितनी संख्या भारी…"; शिवसेनेचा प्रमुख कोण?, रावसाहेब दानवेंनी स्पष्टचं सांगितलं

Raosaheb Danve : "जिसकी जितनी संख्या भारी…"; शिवसेनेचा प्रमुख कोण?, रावसाहेब दानवेंनी स्पष्टचं सांगितलं

googlenewsNext

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (BJP Raosaheb Danve) यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेलेल्या आमदार आणि खासदारांनी बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे. आता शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत? तर जास्तीत जास्त शिवसेना नेत्यांचं नेतृत्व कोण आहे, हे बघावं लागेल. त्यामुळे जिसकी जितनी संख्या भारी… उसकी उतनी भागीदारी असं म्हणता येईल. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाशी युती न करणं हे जनतेलाच नव्हे तर आमदार आणि खासदारांनाही पसंत नव्हतं. पण शिवसेनेने सत्तेसाठी भाजपाला फसवल्याचा आरोप देखील यावेळी दानवे यांनी केला आहे. 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार भाजपा पाडेल असा आरोप केला जात होता. मात्र त्यांच्याच गुणांनी सरकार पडलं असं देखील दानवेंनी म्हटलं आहे. "विधानसभेतलं आमदारांचं भाषण बघितलं तर एका मुद्द्यावर एकवाक्यता आहे. बंड नाही केलं उठाव केला. आम्हीच शिवसैनिक आहोत. आम्ही फुटलो, बंडखोरी केली, हे चुकीचं आहे. सेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे एक विचार आहेत. विचारावर आधारीत ती युती होती. ती युती 25 वर्ष राहिली. ही युती असताना आम्ही लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढलो. लोकांनी युतीला कल दिला. बहुमत दिलं. असं असतानाही शिवसेनेनं दगा फटका केला. आमदारांचं म्हणणं ऐकलं नाही. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपायी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली."

"जनता आणि आमदार, खासदारांनाही ही युती पसंत नव्हती. केव्हातरी हा स्फोट होणार होता. पहिल्या दिवसापासून भाजपा आमचं सरकार पाडणार, असं हे म्हणत होते. पण यांच्याच गुणानं हे सरकार पाडणार, असं आम्ही म्हणत होतो" असंही दानवेंनी म्हटलं आहे. तसेच "शिवसेनेचं नेतृत्व कुणाचं आहे? जितनी जिसकी संख्या भारी… उतनी उसकी भागीदारी… संख्या कोणाकडे आहेत… 18 पैकी 12 खासदार शिंदेंकडे… 55 पैकी 40 आमदार शिंदेंकडे आहे. शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत… दावा केला नाही, पण नेता तोच आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं काहीही असू द्या. भाजपाचा यांच्या फुटीशी काहीही संबंध नाही. हे फुटले आणि यांनी आम्हाला पाठिंबा दिला असंही नाही. उलट आम्हीच त्यांना पाठिंबा दिला. त्यांचाच मुख्यमंत्री केला" असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला"; रामदास कदम ढसाढसा रडले, म्हणाले....

रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. य़ानंतर आता रामदास कदम यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. "52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होतं वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असं सांगितलं होतं" असंही म्हटलं आहे. 

 

Web Title: BJP Raosaheb Danve reaction over Maharashtra Political situation and shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.