भाकड जनावरांसह भारिपचा मोर्चा

By admin | Published: May 3, 2015 12:42 AM2015-05-03T00:42:38+5:302015-05-03T00:42:38+5:30

गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करून शेतकऱ्यांना नको असलेली भाकड जनावरे शासनाने ताब्यात घ्यावीत़ त्यापोटी शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा

Bharipachal Front with fierce animals | भाकड जनावरांसह भारिपचा मोर्चा

भाकड जनावरांसह भारिपचा मोर्चा

Next

अकोला : गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करून शेतकऱ्यांना नको असलेली भाकड जनावरे शासनाने ताब्यात घ्यावीत़ त्यापोटी शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करीत भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने भाकड जनावरांसह शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
राज्य शासनामार्फत गोवंश हत्याबंदीचा कायदा करण्यात आला. त्यामुळे बैल विक्रीचे व्यवहार ठप्प झाले असून, जनावरांच्या खरेदी-विक्रीचे बाजार ओस पडू लागले आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने गोवंश कायद्यात सुधारणा करून शेतकऱ्यांकडील भाकड जनावरे शासनाने ताब्यात घ्यावी, त्यापोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ४० हजार रुपयांचा मोबदला शासनाकडून देण्यात यावा, या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अ‍ॅड.आंबेडकर यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)

Web Title: Bharipachal Front with fierce animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.