औरंगाबादसह लातूर, हिंगोलीत अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:19 AM2018-04-11T05:19:40+5:302018-04-11T11:03:05+5:30

मराठवाड्यात औरंगाबाद शहरासह लातृूर, हिंगोली जिल्ह्यांत मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भामध्ये उद्या बुधवार तसेच गुरूवारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Aurangabad, Latur and Hingoli rain | औरंगाबादसह लातूर, हिंगोलीत अवकाळी पाऊस

औरंगाबादसह लातूर, हिंगोलीत अवकाळी पाऊस

googlenewsNext

पुणे/औरंगाबाद : मराठवाड्यात औरंगाबाद शहरासह लातृूर, हिंगोली जिल्ह्यांत मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भामध्ये उद्या बुधवार तसेच गुरूवारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात लाडसावंगी व फुलंब्री तालुक्यातील आळंद परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आंब्याचा बहार गळाल्याने तसेच कै-यांचा सडा पडल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. लातूर शहरासह जिल्ह्यात सायंकाळी पाऊस झाला. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ, डिगोळ, जांभळवाडी, सुमठाणा, नागेवाडी, बावलगाव, चामरगा परिसरात मेघगर्जनेसह पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात सोमवार वगळता सलग पाचव्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील चुंचा शिवारात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाण्याचे डोह साचले होेते. फुटाणा परिसरातही पाऊस झाला.

>नगर जिल्ह्यातही गारपीट
अहमदनगर जिल्ह्यातील जायभायवाडी (ता जामखेड) येथे वज पडून गाय मृत्युमुखी पडली. जायभायवाडीसह तेलंगशी, मोहरी, धामनगाव, गवळवडी, गीतवाडी, पांढरेवाडीसह खर्डा परिसरात गारपीट झाली.

Web Title: Aurangabad, Latur and Hingoli rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.