रुग्ण मुलीवर अत्याचार

By admin | Published: September 29, 2014 01:00 AM2014-09-29T01:00:44+5:302014-09-29T01:00:44+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या एका अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करीत असताना डॉक्टरने बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Atrocities on sick girls | रुग्ण मुलीवर अत्याचार

रुग्ण मुलीवर अत्याचार

Next

मेडिकल : सोनोग्राफी करताना डॉक्टराचे दुष्कृत्य
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या एका अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करीत असताना डॉक्टरने बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या या घटनेमुळे मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित १४ वर्षीय मुलगी ही उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. तिला पोटाचा त्रास होता. नागपुरात तिचा मामा राहतो. गरीब कुटुंबातून असल्याने मामाने तिला उपचारासाठी मेडिकलमध्ये आणले होते. मुलीची स्थिती पाहून तिला भरती करण्यात आले. शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास डॉ. पंडित पाचोरे याने तिचे सिटी स्कॅन केले. यावेळी तिच्यासोबत महिला अटेंडन्स होती. सिटी स्कॅन झाल्यानंतर तिला सायंकाळी सोनोग्राफी करण्यास सांगितले. सायंकाळी ५.४५ मिनिटांनी तिला सोनोग्राफीसाठी आणले. यावेळी तिच्यासोबत मामाचा मुलगाही होता. रेडिओलॉजी विभागाच्या ८६ क्रमांकाच्या कक्षात सोनोग्राफी तपासणी केली जाते. यावेळी सोनोग्राफी कक्षात डॉ. पंडित पाचोरे होते, परंतु कुठलीही महिला अटेंडन्स किंवा परिचारिका नव्हती. विशेष म्हणजे नियमानुसार पुरुष डॉक्टर जर महिलेची तपासणी करीत असेल तर कुणीतरी महिला सोबत असणे आवश्यक आहे. परंतु डॉ. पाचोरे यांनी कक्षात असलेल्या महिला परिचारिकला सोबत न घेता एकट्यानेच सोनोग्राफी केली. मुलीने तक्रारीत सांगितल्याप्रमाणे, पहिल्या वेळी सोनोग्राफीची तपासणी करीत असताना छेडखानी होत असल्याचे समजले नाही, परंतु डॉ. पाचोरे यांनी जेव्हा आपत्तीजनक बोलायला सुरुवात केली तेव्हा संशय आला. परंतु सोबत कुणीच नसल्याने गप्प होते.
सोनोग्राफी तपासणीनंतर मुलगी वॉर्डात आली. तिला राहून राहून डॉक्टराचे दुष्कृत्य आठवत होते. तिने ही आपबिती शेजारच्या महिला रुग्णाला सांगितली. महिला रुग्णाने मामाच्या मुलाला याची माहिती देण्यास सांगितले. मामाच्या मुलाने तात्काळ नातेवाईकांना बोलवून घेतले. नातेवाईकांनी अजनी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम ६ आणि १०, ३७६ (क) (ड) (बलात्कार) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Atrocities on sick girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.