नांगरे-पाटलांना आठवले सांगली एसपीचे ‘प्रताप’, डीजींकडे तक्रारींचा सविस्तर अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:19 AM2017-11-16T02:19:52+5:302017-11-16T02:20:03+5:30

खाकी वर्दीआडच्या काळ्या वर्तनाबद्दल राज्यभरातून निषेधाचा सूर निघाल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या कारकिर्दीत घडलेल्या विविध गैरवर्तनाचे स्मरण झाले आहे.

 Athara Sangli SP's 'Pratap', detailed report of DG | नांगरे-पाटलांना आठवले सांगली एसपीचे ‘प्रताप’, डीजींकडे तक्रारींचा सविस्तर अहवाल

नांगरे-पाटलांना आठवले सांगली एसपीचे ‘प्रताप’, डीजींकडे तक्रारींचा सविस्तर अहवाल

Next

जमीर काझी 
मुंबई :खाकी वर्दीआडच्या काळ्या वर्तनाबद्दल राज्यभरातून निषेधाचा सूर निघाल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या कारकिर्दीत घडलेल्या विविध गैरवर्तनाचे स्मरण झाले आहे. सांगलीतील अवैध धंद्याबरोबरच गैरकृत्ये व अधिका-यांच्या गैरप्रकारांचा अहवाल त्यांनी डीजींकडे पाठवला आहे.
नांगरे-पाटील यांनी चार पानी अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठविला आहे. त्यात शिंदे यांनी आपली जबाबदारी योग्यपणे पार न पाडल्याचे नमूद केले आहे. या अहवालामुळे शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. शिंदे यांच्यावरील कारवाईदेखील अटळ असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा गैरप्रकार लक्षात येण्यासाठी नांगरे-पाटील यांना इतका विलंब का झाला, असा सवाल वरिष्ठ पोलीस अधिकारी व वर्तुळातून उपस्थित होत आहे.
महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी दत्ता शिंदे सांगलीच्या अधीक्षकपदी रुजू झाल्यापासून सांगलीत घडलेली विविध गैरकृत्ये, अधिकाºयांच्या बेजबाबदार वर्तनाबाबत सविस्तर आढावा घेतला. त्यात वादग्रस्त उपनिरीक्षक कामटेवर पूर्वीच्या प्रकरणात खातेनिहाय कारवाई प्रलंबित ठेवणे, कामटेने कोथळे हा कोठडीतून पळून गेल्याची खोटी माहिती दिल्यानंतर योग्य कारवाई न करणे, सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला मटका, जुगार व अवैध धंदे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नसताना वरिष्ठांकडे जबाबदारी न देता मर्जीतील अधिकाºयाकडे सूत्रे सोपविणे, निलंबित महिला निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तक्रारदार महिलेवर केलेली खोटी कारवाई, पोलिसांकडून ९ कोटींच्या दरोड्याचे प्रकरण, चांदोली अभयारण्यात वनविभागाची परवानगी नसताना दरोडेखोरांना शोधण्याच्या बहाण्याने सफर करणे आदी विविध घटना विस्तृतपणे अहवालात मांडल्या आहेत.शिंदे यांची उचलबांगडी निश्चित असल्याची शक्यता आहे.
आतापर्यंत दुर्लक्ष का?
सांगली जिल्ह्यात अवैध धंदे व गैरप्रकार उघडपणे सुरू असल्याचे महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी अहवालात नमूद केले आहे. तरीदेखील यापूर्वी त्याबाबत त्यांनी कार्यवाही का केली नाही? आत्तापर्यंत त्याकडे दुर्लक्ष करण्यामागील कारण काय? त्याबाबत त्यांना आत्ताच कशी जाग आली? की आपल्यावरील जबाबदारी टाळण्यासाठी हा अहवाल बनविला, असा सवाल वरिष्ठ अधिकाºयांकडून उपस्थित होत आहे.
गृहविभागाकडून सविस्तर तपास
सांगलीतील पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे या तरुणाची निर्घृण हत्या करून अंबोली घाटात मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणी उपनिरीक्षक युवराज कामटे व अन्य पोलीस सीआयडीच्या ताब्यात असले तरी वरिष्ठ अधिकाºयांवरही कारवाई व्हावी यासाठी सांगलीतील नागरिकांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठांच्या बेजबाबदारपणाबाबत महासंचालक व गृह विभागाकडून सविस्तर तपास केला जात आहे.

Web Title:  Athara Sangli SP's 'Pratap', detailed report of DG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.