सेना गटप्रमुख हत्येप्रकरणी ५ अटकेत

By admin | Published: October 23, 2014 04:10 AM2014-10-23T04:10:04+5:302014-10-23T04:10:04+5:30

मालाड खोतडोंगरी परिसरात मंगळवारी संध्याकाळी शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांना अटक केली आहे.

Army Attendant murder case 5 | सेना गटप्रमुख हत्येप्रकरणी ५ अटकेत

सेना गटप्रमुख हत्येप्रकरणी ५ अटकेत

Next

मुंबई : मालाड खोतडोंगरी परिसरात मंगळवारी संध्याकाळी शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्या पाच आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. या अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रमेश जाधव हे शिवसेनेचे गटप्रमुख होते तसेच मालाड खोतडोंगरी येथील बबनराय चाळीत वास्तव्यास होते. मंगळवारी संध्याकाळी अटक केलेल्या आरोपींचे खोतडोंगरी परिसरात एका मारवाडी दुकानदाराशी भांडण सुरू होते. त्यावेळी रमेश यांच्या लहान भावाने भांडण करता असे म्हणत हटकले असता त्या तरुणांनी रमेशच्या लहान भावालाच दटावले. त्यानंतर त्याने रमेश यांना फोन करुन बोलावले. पुढे दोन्ही गटांत वाद वाढत गेला. घटना घडली तेव्हा आरोपींच्या हातात हत्यार होते. रमेश जीव वाचवण्यासाठी पळत असताना एका घराच्या पत्र्यावरून घरांत कोसळले. त्यानंतर आरोपींनी त्या घरांत घुसून धारदार शस्त्राने रमेश यांच्यावर वार केले. जखमी रमेश यांना ट्रॉमा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेचे परिसरात तीव्र पडसाद उमटले, त्यांच्या नातेवाइकांसह शिवसेनेच्या नेत्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आंदोलन केले. तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर रास्ता रोकोही केला. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याकरिता हे आंदोलन करण्यात आले. मध्यरात्री पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी घटनास्थळाची पाहणी केली, तसेच वातावरण चिघळू नये याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. तसेच मारिया यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करू, अशी ग्वाही दिली तेव्हा जमावाचा रोष निवळला. पोलिसांनी रात्री उशिरा मालाडमधून आरोपींना गजाआड केले. तिघा आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर अन्य दोन अल्पवयीन आरोपींना बुधवारी पहाटे अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Army Attendant murder case 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.