करंजीच्या शेतकऱ्यांशी अंजली तेंडूलकरनी सांधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:45 AM2017-09-04T00:45:43+5:302017-09-04T00:46:10+5:30

क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या सौभाग्यवती अंजली तेंडूलकर यांनी पाथर्डी तालूक्यातील करंजी गावाला धावती भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला

Anjali Tendulkar's interaction with Karanji farmers | करंजीच्या शेतकऱ्यांशी अंजली तेंडूलकरनी सांधला संवाद

करंजीच्या शेतकऱ्यांशी अंजली तेंडूलकरनी सांधला संवाद

Next

पाथर्डी ( जि. अहमदनगर) : क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या सौभाग्यवती अंजली तेंडूलकर यांनी पाथर्डी तालूक्यातील करंजी गावाला धावती भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेती करण्यामध्ये रस असल्याचीे भावनाही त्यांनी व्यक्त केली.
रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता सचिन तेंडूलकर यांच्या पत्नी अंजली एका आलीशान गाडीमधून करंजी येथील भट्टेवाडी येथे दाखल झाल्या. यावेळी अंजली तेंडूलकर यांच्या मावस बहीण श्रीमती कलीआ चाँदमाल सोबत होत्या. त्या शेतीतज्ञ असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्यासोबत आलेल्या तेंडूलकर यांचे संत्रा, मोसंबी आणि डाळींबाचे फळे देवून स्वागत केले. करंजी येथील भट्टेवाडी येथे सोशल सेंटर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले जाते. त्यानिमित्ताने गोवा येथून तेंडूलकर यांच्या मावस बहीण श्रीमती कमीआ चाँदमाल व अ‍ॅलीक्स मायकल या करंजी येथील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी गेली आठ दिवसापासुन ठाण मांडून आहेत. आपली बहीण ग्रामीण भागात एका खेडेगावात नेमक काय काम करतेय ते पाहाण्यासाठी सचिनची पत्नी अंजली यांनी थेट करंजी गाठली. यावेळी सखाराम क्षेत्रे, महादेव गाडेकर,पप्पू क्षेत्रे यांच्या शेतीमध्ये नैसर्गिक शेती कशा पधतीने करावी, याचे प्रात्यक्षिक सुरू आहे. कुठल्याही प्रकारचे रासायनिक खते न वापरता तयार करण्यात आलेले चिकू,संत्रा,मोसंबी केळी,वांगे, पालकभाजी, कोथंबीर या फळबागांची पहाणी तेंडूलकर यांनी केली.
यावेळी त्या म्हणाल्या, काळ बदलत चालला आहे. उदयोगधंद्यांमध्ये थोडी मंदिची लाट आहे. शेती हा तर शेतकऱ्यांच्या जीवन जगण्याचा महत्वाचा पर्याय आहे. शेती करण्याची आवड आहे.
भारतरत्न आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडूलकर यांच्या निधीतून भट्टेवाडी येथे सभामंडप व काँक्रीट रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी गावचे सरपंच रफीक शेख यांनी तेंडूलकर यांच्याकडे केली. तेंडूलकर यांनी भट्टेवाडी येथील शेतकऱ्यांच्या घरीच दुपारचे जेवण घेतले. दूध, बाजरीची भाकरी व सोबत हिरव्या मिरचीचा ठेसा असे जेवण त्यांनी घेतले .
--------
सचिनला घेवुन येईन....
शेतकऱ्यांच्या व्यथा सचिनला माहित आहेत. काही गाव त्याने दत्तक घेतली आहेत. बहिणीने राबवलेल्या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी तुमच्या आवडत्या सचिनला पुढच्या वेळेस घेवून येईन, असे अंजली तेंडूलकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासित केले. यावेळी छगनराव क्षेत्रे , डॉ मच्छिंद्र गाडेकर , भानुदास अकोलकर, जहांगीर मनियार, ग्रामसेवक राजेंद्र साखरे ,तनवीर शेख, आकाश क्षेत्रे, सचिन मेजर, सुनिल मुरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

Web Title: Anjali Tendulkar's interaction with Karanji farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.