चाकरमानी निघाले बाप्पाच्या भेटीला, ‘अ‍ॅडव्हान्स’ बुकिंग फुल्ल : गणपती विशेष २,0४७ एसटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:19 AM2017-08-21T05:19:23+5:302017-08-21T05:19:58+5:30

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºयांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे गर्दी नियंत्रणासाठी आणि उत्सव काळात प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रवाशांचा ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’कडे कल आहे. उत्सव काळासाठी एसटीने तब्बल २ हजार २१६ जादा एसटीची व्यवस्था केली आहे. यापैकी २ हजार ४७ एसटी बस अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये फुल्ल झाल्या आहेत.

 'Advance' booking is complete with Bappa's visit to Chakarmani: Ganapati special 2,047 ST bus | चाकरमानी निघाले बाप्पाच्या भेटीला, ‘अ‍ॅडव्हान्स’ बुकिंग फुल्ल : गणपती विशेष २,0४७ एसटी बस

चाकरमानी निघाले बाप्पाच्या भेटीला, ‘अ‍ॅडव्हान्स’ बुकिंग फुल्ल : गणपती विशेष २,0४७ एसटी बस

Next

- महेश चेमटे 
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे गर्दी नियंत्रणासाठी आणि उत्सव काळात प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रवाशांचा ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’कडे कल आहे. उत्सव काळासाठी एसटीने तब्बल २ हजार २१६ जादा एसटीची व्यवस्था केली आहे. यापैकी २ हजार ४७ एसटी बस अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये फुल्ल झाल्या आहेत. कोकण मार्गासह पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या १०० गणपती विशेष एसटी फुल्ल झाल्या आहेत.
गणपती विशेष एसटी वाहतुकीचा टप्पा २० आॅगस्टपासून सुरू झाला आहे. हा टप्पा २४ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या पाच दिवसांपैकी २३ आॅगस्टला सर्वाधिक बस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. २२ आॅगस्ट रोजी एसटीच्या ३५८ बस, २३ आॅगस्ट रोजी १ हजार ३८१ बस आणि २४ आॅगस्ट रोजी २७३ बस सोडण्यात येणार आहेत. टोल नाक्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी उत्सव काळात २२, २३ आणि २४ आॅगस्ट रोजी एसटीला टोलमुक्ती देण्यात आली आहे.
तसेच गणपतीसाठी पश्चिम महाराष्ट्रातही एसटीने १०० जादा एसटी चालविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर या मार्गावर जादा एसटी धावणार आहेत. या जादा एसटीचेदेखील आगाऊ आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एसटी महामंडळातून देण्यात आली.
जादा एसटीचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग २२ जुलैपासून सुरू करण्यात आले, तर ग्रुप बुकिंग १५ जुलै रोजी सुरू झाले होते. परतीच्या प्रवासाचे बुकिंग २३ जुलैपासून सुरू करण्यात आले.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील १५० एसटी फुल्ल

कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी होते. परिणामी, गर्दी नियंत्रणासाठी आगार नियंत्रकाला जादा एसटी सोडण्याचा अधिकार आहे. या धर्तीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी स्थानकातून प्रत्येकी १५० एसटीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या एसटीदेखील अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये फुल्ल झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

२२ ते २४ आॅगस्टदरम्यान
एसटी फुल्ल

...तर आणखी बस सोडणार
गणेशोत्सव आणि कोकण यांचे नाते अतूट आहे. गणेशोत्सवासाठी सर्व प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा एसटीची व्यवस्था केली आहे. गरज पडली तर कोकण मार्गावर आणखी एसटी सोडण्यात येतील. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांशी प्रवासी खासगी बसला प्राधान्य देतात. यामुळे या मार्गावर कोकणाच्या तुलनेत कमी एसटी उपलब्ध केल्या आहेत.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष

मध्य रेल्वेच्या आणखी ८ विशेष फेऱ्या

गणेशोत्सव काळातील गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेकडून आणखी ८ विशेष फेºया चालवल्या जाणार आहेत. सद्य:स्थितीतील बहुतांशी ट्रेनचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे मुंबई-चिपळूण, पुणे -सावंतवाडी मार्गावर या फेºया चालवण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.
ट्रेन क्रमांक (०११०१ ) मुंबई-चिपळूण-मुंबई या मार्गावर चार फेºया चालवण्यात येणार आहेत. २१ आॅगस्ट ते २५ आॅगस्ट या कालावधीत या ट्रेन सोडण्यात येणार आहेत. २१ आॅगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटणार असून चिपळूणला त्याच दिवशी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे.
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे, दिवाणखवटी, खेड आणि अंजनी या स्थानकांवर थांबणार आहे. या ट्रेनचा परतीचा प्रवास (०११०२) चिपळूण येथून २१ आॅगस्टला सायंकाळी ५.४५ वाजता सुरू होणार आहे. त्याच दिवशी रात्री ११.४० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

मनमाड-करमळी वन वे विशेष (एक फेरी)
ट्रेन क्रमांक (०१२७१) मनमाड येथून २२ आॅगस्ट रोजी दुपारी ४.१५ वाजता सुटणार असून करमळी येथे दुसºया दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचणार आहे. ही ट्रेन नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबणार आहे.
करमळी-अजनी वन वे विशेष (एक फेरी)
ट्रेन क्रमांक (०१२७२) करमळी येथून २३ आॅगस्टला दुपारी १ वाजता सुटणार असून अजनी येथे दुसºया दिवशी दुपारी २.१५ वाजता पोहोचणार आहे. ही ट्रेन सावंतवाडी रोड, कुडाळ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, वर्धा या स्थानकांवर थांबणार आहे.
पुणे-सावंतवाडी रोड-पुणे (२ फे ऱ्या)
ट्रेन क्रमांक (०१४६१) पुणे येथून २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजता सुटणार असून सावंतवाडी रोड येथे दुसºया दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचणार आहे.
ट्रेन क्रमांक (०१४६२) सावंतवाडी रोड येथून २३ आॅगस्टला दुपारी २.०५ वाजता सुटणार असून पुणे स्थानकावर मध्यरात्री ३.५५ वाजता पोहोचणार आहे.
च्थांबे : लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप.

Web Title:  'Advance' booking is complete with Bappa's visit to Chakarmani: Ganapati special 2,047 ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.