म्हाडाच्या ८१९ घरांसाठी ७८ हजार ६७४ अर्ज, ५३ हजार ११९ अर्जदारांनी केला अनामत रकमेचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:47 AM2017-10-26T01:47:52+5:302017-10-26T01:48:04+5:30

मुंबई : वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून, ८१९ घरांसाठी अखेरपर्यंत ७८ हजार ६७४ अर्ज दाखल झाले आहेत.

78 thousand 674 applications for 81 houses of MHADA, 53 thousand 119 applicants paid the deposit amount | म्हाडाच्या ८१९ घरांसाठी ७८ हजार ६७४ अर्ज, ५३ हजार ११९ अर्जदारांनी केला अनामत रकमेचा भरणा

म्हाडाच्या ८१९ घरांसाठी ७८ हजार ६७४ अर्ज, ५३ हजार ११९ अर्जदारांनी केला अनामत रकमेचा भरणा

Next

मुंबई : वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून, ८१९ घरांसाठी अखेरपर्यंत ७८ हजार ६७४ अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांपैकी ५३ हजार ११९ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.
म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी करण्याचा २३ आॅक्टोबर हा अखेरचा दिवस होता. अखेरच्या मुदतीपर्यंत ६६ हजार ७८० जणांनी म्हाडाच्या घरासाठी संकेतस्थळावर नोंद केली. अर्ज सादर करण्यासाठी २४ आॅक्टोबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत अखेरचा दिवस होता. या दिवसापर्यंत ७८ हजार ६७४ अर्ज दाखल झाले. एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरणा करण्यास चलननिर्मिती २५ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत करता येणार होती. आॅनलाइन पेमेंट स्वीकृती २६ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत करता येणार आहे. एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरणा २६ आॅक्टोबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.

Web Title: 78 thousand 674 applications for 81 houses of MHADA, 53 thousand 119 applicants paid the deposit amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.