5 thousand complaints against DSK | डीएसकेंविरुद्ध ५ हजार तक्रारी

पुणे  - गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध आतापर्यंत ५ हजार १३८ जणांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यातील रक्कम ३६७ कोटी रुपयांहून अधिक आहे़
डी़ एस़ कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर आता पुन्हा तक्रारदारांचा ओघ वाढला आहे़ आर्थिक गुन्हे शाखेने ५ मार्चपासून पुन्हा तक्रारी घेण्यास सुरुवात केली असून गुरुवारी दिवसभरात १८० जणांनी तक्रारी नोंदविल्या़ विशेष न्यायालयाने डी़ एस़ कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे़
याबाबत सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी सांगितले की, डी. एस. कुलकर्णी यांच्या एकूण ६९ कंपन्या आहेत. त्यांची २७६ बँक खाती गोठविली आहेत.


Web Title: 5 thousand complaints against DSK
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.