मोटरसायकलच्या धडकेत 2 ठार, 3 जखमी

By admin | Published: May 5, 2016 01:16 PM2016-05-05T13:16:14+5:302016-05-05T13:16:14+5:30

पारनेरमधील सोबलेवाडी शिवारात दोन मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले

2 killed, 3 injured in motorcycle accident | मोटरसायकलच्या धडकेत 2 ठार, 3 जखमी

मोटरसायकलच्या धडकेत 2 ठार, 3 जखमी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
अहमदनगर, दि. 05 - पारनेरमधील सोबलेवाडी शिवारात दोन मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री हा अपघात झाला. 
 
पारनेर - कान्हूर पठार रस्त्यावर सोबलेवाडी शिवारात मोटरसायकल नंबर एम.एच. 16 एसी 4034 व एम. एच.16 ए. एक्स. 5047 यांची समोरासमोर धडक झाली. यात भास्कर विठ्ठल परंडवाल (रा. अळकुटी ता.  पारनेर)व अमोल बाळासाहेब घोडके (रा. वाळकी ता. नगर) हे  दोघे जागीच ठार झाले असुन गणेश  रामदास भालेकर (रा. मुगंशी ता. पारनेर), भरत मधुकर पवार (रा. सुपा ता. पारनेर) व शशिकांत गजानन वाव्हळ (रा. जवळा ता. पारनेर) हे तिघे जखमी झाले आहेत. त्याना नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: 2 killed, 3 injured in motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.