१६ वर्षांच्या मुलीने रचला स्वत:च्याच हत्येचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 04:53 AM2018-03-09T04:53:17+5:302018-03-09T04:53:17+5:30

एका १६ वर्षीय मुलीने स्वत:च्याच हत्येचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. खार परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत राहणा-या या मुलीचे...

16-year-old girl created her own murder | १६ वर्षांच्या मुलीने रचला स्वत:च्याच हत्येचा बनाव

१६ वर्षांच्या मुलीने रचला स्वत:च्याच हत्येचा बनाव

Next

- मनीषा म्हात्रे
मुंबई  - कामानिमित्त थायलंडमध्ये राहणाºया आईवडिलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एका १६ वर्षीय मुलीने स्वत:च्याच हत्येचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. खार परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत राहणा-या या मुलीचे वडील थायलंडमध्ये डायमंड मर्चंट आहेत, तर आईदेखील काही महिन्यांपूर्वी त्यांच्यासोबत थायलंडमध्येच राहायला गेली होती.
‘कॉलेजमधून घरी आली तेव्हा दरवाजा अर्धवट उघडाच होता. मी आत जाऊन बसणार तोच पाठीमागून कोणीतरी आले. त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मी ओरडत शेजारच्यांकडे धाव घेतली. तसेच गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम आणि इमेलवरून धमकीचे मेल येत आहेत,’ असे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत तिने नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आईवडिलांना याबाबत समजताच ते मायदेशी परतले. तिची काळजी घेऊ लागले. इथे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात सीसीटीव्हीमध्ये मुलीपाठोपाठ कोणीच गेले नसल्याचे दिसले. सुरक्षारक्षकानेही मुलीपाठोपाठ कोणी गेले नसल्याबाबत सांगितले. त्यामुळे इमारतीतील कोणीतरी असल्याच्या संशयातून पोलिसांनी तपास सुरू केला. गूढ वाढतच होते. दहा दिवस उलटले तरीही हाती काहीच लागत नसल्याने पोलिसांनी ३ मार्च रोजी मुलीचीच उलटतपासणी सुरू केली.
तेव्हा तपासात तन्वीने स्वत: बनावट इन्स्टाग्राम व इमेल अकाउंट उघडून त्यावरून स्वत:लाच अश्लील, धमकीचे मेसेज केल्याचे उघडकीस आले. आईवडिलांना आपली काळजी नाही, असे तिला वाटत होते. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी तिने स्वत:च्याच हत्येचा बनाव केल्याचे समोर आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी सांगितले.

Web Title: 16-year-old girl created her own murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.