मुंबई-नागपूर मार्गावर रेल्वेच्या १४ विशेष फेऱ्या, १० मेपासून आरक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:10 AM2018-05-08T05:10:29+5:302018-05-08T05:10:29+5:30

मे महिन्याच्या मध्यावधीनंतर फिरायला जाणा-या प्रवाशांची घरी परतण्याची तयारी सुरू होते. यामुळे या काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर १४ विशेष फेºया चालविण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून १७ मेपासून दर गुरुवारी आणि १८ मेपासून दर शुक्रवारी नागपूर येथून ही विशेष ट्रेन धावणार आहे.

14 special rounds of trains on the Mumbai-Nagpur route | मुंबई-नागपूर मार्गावर रेल्वेच्या १४ विशेष फेऱ्या, १० मेपासून आरक्षण सुरू

मुंबई-नागपूर मार्गावर रेल्वेच्या १४ विशेष फेऱ्या, १० मेपासून आरक्षण सुरू

googlenewsNext

 मुंबई -  मे महिन्याच्या मध्यावधीनंतर फिरायला जाणा- प्रवाशांची घरी परतण्याची तयारी सुरू होते. यामुळे या काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर १४ विशेष फे-या चालविण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून १७ मेपासून दर गुरुवारी आणि १८ मेपासून दर शुक्रवारी नागपूर येथून ही विशेष ट्रेन धावणार आहे. १० मेपासून विशेष ट्रेनचे आरक्षण खुले होणार आहे.
ट्रेन क्रमांक ०२०३१ मुंबई-नागपूर साप्ताहिक विशेष ट्रेन १७ मे ते २८ जून या कालावधीपर्यंत सुरू राहतील. १७ मेपासून ती दर गुरुवारी सीएसएमटी येथून रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून, शुक्रवारी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल. त्यानंतर, ०२०३२ ही विशेष ट्रेन शुक्रवारी दुपारी ३ वाजता नागपूरहून मुंबईसाठी रवाना होईल. ती दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, धामणगाव, वर्धा या स्थानकांवर थांबेल. १० मेपासून विशेष शुल्कासह या विशेष ट्रेनचे आरक्षण खुले होणार आहे.

Web Title: 14 special rounds of trains on the Mumbai-Nagpur route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.