राज्यात ३० हजार रस्ते अपघातांत १३ हजार मृत्यू; परिवहनमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 07:10 AM2019-02-05T07:10:42+5:302019-02-05T07:11:28+5:30

राज्यात गेल्या वर्षी सुमारे ३० हजार रस्ते अपघात झाले असून त्यात १३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

13 thousand deaths in 30 thousand road accidents in the state; Transportation Information | राज्यात ३० हजार रस्ते अपघातांत १३ हजार मृत्यू; परिवहनमंत्र्यांची माहिती

राज्यात ३० हजार रस्ते अपघातांत १३ हजार मृत्यू; परिवहनमंत्र्यांची माहिती

Next

मुंबई  - राज्यात गेल्या वर्षी सुमारे ३० हजार रस्ते अपघात झाले असून त्यात १३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. एकूण अपघातांमध्ये सुमारे ११ हजार मृत्यू म्हणजे ८० टक्के मृत्यू हे मानवी चुकांमुळे झाल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातांबाबत जनजागृती करण्यासाठीच परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखेमार्फत राज्यभरात ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन केले असून त्याच्या शुभारंभाप्रसंगी रावते बोलत होते.
नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात रावते यांनी सांगितले की, राज्यात वाहनांची संख्या ३ कोटी २९ लाख इतकी झाली असून त्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. अपघातांची आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. वाहनांच्या वेगाबरोबर अपघातांची आणि त्यातील मृत्यूंची संख्या वाढत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे हा अति वेगामुळे मृत्यूचा सापळा झाला आहे.
अपघात रोखण्यासाठी सर्वांनी रस्ते सुरक्षेबाबत जाणीव ठेवून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक व कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. पण शासनाने हेल्मेटची सक्ती केली, असे म्हणत या चांगल्या मोहिमेबाबत अपप्रचार केला जात आहे. वृत्तपत्रांनीही या मोहिमेला ‘सक्ती’ असे न म्हणता हेल्मेटच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

अपघाती मृत्यूमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

परिवहन आयुक्त शेखर चन्ने या वेळी म्हणाले, राज्यात ३ कोटी ४१ लाख इतके परवानाधारक वाहनचालक आहेत. राज्यात अपघातांचे प्रमाण ०.३६ टक्क्यांनी कमी झाले असले, तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण मात्र ४ टक्क्यांनी वाढले आहे. पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकी यांच्या अपघातांचे प्रमाण हे ६६ टक्के इतके आहे. अपघाती मृत्यूमध्ये २५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. राज्यात १ हजार ३२४ इतके ब्लॅक स्पॉट असून ते काढून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.

मुंबईत सीसीटीव्हीमुळे कारवाईत वाढ
मुंबई शहरात अतिवेग आणि बेदरकार वाहन चालविल्याप्रकरणी २०१७ मध्ये ४१ हजार कारवाया करण्यात आल्या होत्या. पण त्यानंतर शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे १ जानेवारी २०१८ पासून शहरात अशा ७ लाख ७० हजार लोकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी दिली.
वाहतुकीचे नियम मोडणाºयांवर सध्या मुंबईत ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येत असून लवकरच संपूर्ण राज्यात ही यंत्रणा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

च्रस्ते अपघातात अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत. जनजागृती करूनही अतिघाईत वेगावर नियंत्रण ठेवत नसल्यामुळेच अनेकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

राज्यात २०१६ मध्ये १२ हजार ९३५, २०१७ मध्ये १२ हजार ५११ तर २०१८ मध्ये १३ हजार ५९ अपघाती मृत्यू झाले आहेत.

Web Title: 13 thousand deaths in 30 thousand road accidents in the state; Transportation Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात