गुजरातमध्ये डोंबिवलीचे १० भाविक ठार, भीषण अपघातात एकाच कुटुंबावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:45 AM2017-08-28T06:45:59+5:302017-08-28T06:46:14+5:30

अहमदाबादजवळील तागडी गावानजीक जीपचालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाºया ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पलिताना या जैन तीर्थस्थळाला निघालेले डोंबिवलीतील १० भाविक व जीपचालक अशा ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

10 dead in Dombivli, 10 people dead in Gujarat | गुजरातमध्ये डोंबिवलीचे १० भाविक ठार, भीषण अपघातात एकाच कुटुंबावर काळाचा घाला

गुजरातमध्ये डोंबिवलीचे १० भाविक ठार, भीषण अपघातात एकाच कुटुंबावर काळाचा घाला

Next

डोंबिवली : अहमदाबादजवळील तागडी गावानजीक जीपचालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाºया ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पलिताना या जैन तीर्थस्थळाला निघालेले डोंबिवलीतील १० भाविक व जीपचालक अशा ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पर्युषण पर्व सांगतेला एकाच कुटुंबातील भाविकांवर मृत्यूने घाला घातल्याचे कळताच डोंबिवलीत शोककळा पसरली.
डोंबिवली पूर्वेतील कस्तुरी प्लाझानजीक असलेल्या निशिगंधा इमारतीत राहणाºया किरण कमलेश शहा, त्यांची मुलगी जिनाली व मुलगा नेमिल, निळकंठ पूजा इमारतीत राहणारे शशिकांत शहा, त्यांची पत्नी रिटा आणि मुलगी धरा, वीणा सोसायटीत राहणारे हितेश शहा, त्यांची पत्नी विभा आणि भाचा नंदीप शहा यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. जैनम हा शशिकांत शहा यांचा १७ वर्षांचा मुलगा बचावला. तो गंभीर जखमी आहे. इतर मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. शशिकांत शहा व कमलेश शहा हे सख्खे भाऊ. त्यापैकी कमलेश यांचा सात वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हितेश शहा हे शशिकांत यांचे आतेभाऊ होते. भावनगर जिल्ह्यातील पलिताना या प्रसिद्ध जैन तीर्थस्थळाला जाण्यासाठी शहा कुटुंबीयांनी शनिवारी सकाळीच गुजरातला जाण्यासाठी कर्णावती एक्स्प्रेस पकडली. बडोद्यात बहीण जयश्री यांच्या घरी रात्रीचे जेवण उरकले. पहाटे साडेपाचला खासगी गाडीने पलिताना येथे दर्शनाला निघाले. जीपचालकाने एका गॅस सिलिंडरच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव जीपने विरुद्ध दिशेने येणाºया ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात जीपचालकासह ११ जणांचा मृत्यू झाला. मृतदेह जवळच्या ज्या रुग्णालयात हलविण्यात आले, तेथील डॉक्टरांनी कमलेश यांचा साडू प्रकाश याच्या मोबाइलवर संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली. अपघातात शहा कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजताच प्रकाश सुन्नच झाले. ज्या बहिणीच्या घरी त्यांनी जेवण घेतले, ती बहीणही मृत्युमुखी पडल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. पण नंतर ती गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

८० वर्षीय आई अनभिज्ञ
हितेश शहा यांची आई हसुमती
शहा या ८० वर्षांच्या असल्याने
त्यांना सोबत नेले नव्हते. त्या वीणा सोसायटीतच आहेत. त्यांना धक्का बसू नये म्हणून मुलगा, सून आणि
नातू अपघातात मरण पावल्याची माहिती त्यांना देण्यात आलेली नाही. सोसायटीत लोक जमल्याने त्या सतत चौकशी करत आहेत, पण त्यांना कोणीही माहिती दिलेली नाही.

Web Title: 10 dead in Dombivli, 10 people dead in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात