VIDEO - सीसीटीव्हीत कैद झाली माबाईल चोरीची हातसफाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2016 09:02 PM2016-12-24T21:02:42+5:302016-12-24T21:03:36+5:30

ऑनलाइन लोकमत  लातूर, दि. 24 -  औसा रोडवरील एका मोबाईलच्या दुकानात ग्राहकाच्या खिशातून मोबाईल चोरी करणारा चोर सीसीटीव्हीत कैद ...

VIDEO - CCTIBLATED CAPACITY MOBILE STRICT HANDSWIFIING! | VIDEO - सीसीटीव्हीत कैद झाली माबाईल चोरीची हातसफाई !

VIDEO - सीसीटीव्हीत कैद झाली माबाईल चोरीची हातसफाई !

Next

ऑनलाइन लोकमत 

लातूर, दि. 24 -  औसा रोडवरील एका मोबाईलच्या दुकानात ग्राहकाच्या खिशातून मोबाईल चोरी करणारा चोर सीसीटीव्हीत कैद झाल्याची घटना घडली. मोबाईल घेवून चोरटा पसार झाला असला तरी सिसीटीव्हीच्या फुटेजनुसार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
 
लातूर शहरातील औसा रोडवरील नंदी स्टॉप येथे नंदी मोबाईल नावाने दुकान आहे. या दुकानात मोबाईल विक्रीसह रिचार्जचीही सुविधा आहे़ सायंकाळच्या सुमारास ग्राहक योगिराज माने हे रिचार्जसाठी काऊंटरवर उभे होते़ सोबतच्या मित्रासोबत गप्पा गोष्टी सुरू असताना बाजूस थांबलेल्या एका चोरट्याने अलगदपणे त्यांच्या वरच्या खिशातील मोबाईल काढला़ लागलीच तो तेथून पसारही झाला. 
काही वेळात मोबाईल खिशात नसल्याचे माने यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नंदी मोबाईलचे रविशंकर जळकोटे यांना संपर्क साधला़
 
तात्काळ दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले़ यात एका चोरट्याने योगिराज माने यांच्या बाजूस थांबून अलगदपणे मोबाईल पळविल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे़ सीसीटीव्हीचे सर्व फुटेज दुकान मालकाने माने यांना देऊन पोलिसात तक्रार देण्यासाठीही सहकार्य केले़ याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. 
 
याबाबत दुकान मालक रविशंकर जळकोटे म्हणाले, सीसीटीव्ही मुळेच चोरीचा प्रकार लक्षात आला़ यातून चोर स्पष्टपणे दिसत आहे़ त्यामुळे दुकानात सीसीटीव्ही किती गरजेची आहे, हे यातून लक्षात येते़ ग्राहकाला आम्ही मदत केल्याने त्यांनी त्याच दिवशी लागलीच दूसरा मोबाईलही आमच्या दुकानातून खरेदी केला.                        
https://www.dailymotion.com/video/x844mbw

Read in English

Web Title: VIDEO - CCTIBLATED CAPACITY MOBILE STRICT HANDSWIFIING!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.